---Advertisement---

बापरे! ‘त्या’ मालिकेवेळी विराट कोहलीला स्टंप फेकून मारण्याचा विचारात होता माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

On: सोमवार, जुलै 5, 2021 6:02 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानाबाहेर आपल्या हटके लूक्स आणि मजेशीर स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तर मैदानात नेहमीच तो आक्रमक भूमिकेत दिसून आला आहे. तो अनेकदा वाद विवादात देखील अडकला आहे. परंतु, २०१३-१४  मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशातच ऑस्ट्रेलियन संघाच्या माजी सलामीवीर फलंदाजाने या दौऱ्यावरील एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा माजी सलामीवीर फलंदाज एड कॉवेन याने फॉक्सस्पोर्ट्स सोबत चर्चा करताना २०१३ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील विराट कोहली बद्दलचा एक किस्सा सांगितला होता. त्याने म्हटले होते की, “त्यावेळी माझी आई आजारी होती आणि विराट कोहलीने काहीतरी असे म्हटले होते, जे खूप चुकीचे होते. एक खाजगी बाब जी अत्यंत संवेदनशील होती. ते खूपच चुकीचे होते, परंतु कोहलीला त्यावेळी जाणवले नव्हते की, त्याने सीमा ओलांडली आहे. त्याला पंचांनी येऊन सांगितले, तेव्हा त्याला जाणीव झाली की सीमा ओलांडली आहे. त्यानंतर त्याने माफी देखील मागितली होती.”(ed cowan statement on virat kohli)

तसेच तो पुढे म्हणाला की, “त्यावेळी मला असे वाटत होते की, तो स्टंप काढून त्याला फेकून मारावे.” परंतु तो पुढे म्हणाला की,”मी भारतीय कर्णधार विराट कोहलीचा चाहता आहे. मी त्याच्या क्रिकेटचा खूप मोठा समर्थक आहे. मला चुकीचे लेखू नका, तो एक चंगला क्रिकेटपटू आहे.”

एड कॉवेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी 
एड कॉवेनने आपल्या कारकिर्दीत एकूण १८ कसोटी सामने खेळले होते. यामध्ये त्याला ३१.२८ च्या सरासरीने १००१ धावा  करण्यात यश आले होते. या दरम्यान त्याला १ शतक आणि ६ अर्धशतक झळकावण्यात यश आले होते. यामध्ये १३६ धाव ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याने ६ मार्च २०१८ रोजी आंतराराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला.

महत्वाच्या बातम्या-

‘विराट’ मनाचा माणूस! कोरोनामुळे जिवलगांना गमावलेल्या कुटुंबाना करणार मदत, मिळवला नव्या संघाशी हात

‘अशी’ ३ कारणे ज्यामुळे पृथ्वी शॉला इंग्लंड दौऱ्यावर पाठवणे ठरेल अयोग्य

‘अशी’ ३ कारणे ज्यामुळे पृथ्वी शॉला इंग्लंड दौऱ्यावर पाठवणे ठरेल अयोग्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---