आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलं अरे तो सचिन फक्त दहावी शिकलाय. विराट कोहली बारावीच्या पुढे गेला नाही आणि तो ईशांत शर्मा तर पाच वर्ष बारावी सोडवत होता. क्रिकेटपटू जास्त शिकलेले नसतात, असंच आपल्याला या उदाहरणांवरून दिसते. अनेकदा करियरवर फोकस करण्यासाठी खेळाडू शिक्षणाकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे केवळ गरजेपुरते शिक्षण घेत मोठं करिअर घडविण्याकडे त्यांचा कल असतो.
यातूनही असे काही क्रिकेटर असतात, जे क्रिकेटसोबतच आपले शिक्षणही पूर्ण करतात. भारतीय क्रिकेटमध्येदेखील असे काही बुद्धिमान क्रिकेटर आहेत ज्यांनी शिक्षणातही मोठी मजल मारली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच भारतीय क्रिकेटपटूंविषयी जाणून घेऊया, ज्यांनी शिक्षणातही चांगले झेंडे गाडले.
हेही पाहा- IAS ते इंजीनीअर ५ उच्चशिक्षीत भारतीय क्रिकेटर
अविष्कार साळवी
भारतीय क्रिकेटमध्ये जो क्रिकेटर सर्वात जास्त शिकला तो म्हणजे अविष्कार साळवी. भारताचा मॅकग्रा मानला गेलेला अविष्कार साळवी टीम इंडियाकडून फक्त चार मॅच खेळू शकला, पण मुंबईसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळताना त्याने लक्षात राहील असा परफॉर्मन्स दिला. क्रिकेटमध्ये करीयर केले असले तरी, आजही चर्चा त्याच्या शिक्षणाची होते. अविष्कार याच्याकडे ॲस्ट्रोफिजिक्स या विषयातील डिग्री आहे. त्याने त्याच गोष्टीत करिअर करायचं ठरवलं असतं तर तो आज, नासा किंवा इस्त्रोसारख्या अवकाश संशोधन करणार्या संस्थांमध्ये, शास्त्रज्ञ म्हणून काम करताना दिसला असता. आजही अविष्कारच भारतीय क्रिकेटमधील सर्वात जास्त शिकलेला क्रिकेटर मानला जातो.
अमेय खुरासिया
अविष्कारनंतर सर्वात जास्त पढाकू क्रिकेटर होण्याचा मानही आणखी एका मुंबईकराचाच. तो क्रिकेटर म्हणजे अमेय खुरासिया. स्टायलिश डावखुरा बॅटर असलेला अमेय टीम इंडियासाठी डझनभर वनडे खेळला, पण टीम इंडियात निवड झाल्याने त्याने आपल्या करिअरमधील एक मोठी संधी सोडलेली. अनेकांना माहीत नसेल पण अमेय खुरासिया यांनी भारतातील सर्वात अवघड समजली जाणारी आयएएस परीक्षा क्लियर केलेली. क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर त्यांची ही इच्छा काही प्रमाणात पुरी झाली. कारण, खुरासिया गेल्या जवळपास दहा वर्षापासून बीसीसीआयच्या प्रशासनात काम करताना दिसतात.
व्यंकटेश अय्यर
या यादीमध्ये तिसरे नाव एकदम लेटेस्ट क्रिकेटरचे आहे. सध्याचे क्रिकेटपटू तर शिक्षणाला अजिबात महत्त्व देत नसताना, सीए आणि एमबीए होणारा हा युवा क्रिकेटर आहे व्यंकटेश अय्यर. व्यंकटेश लहानपणापासून अत्यंत टॅलेंटेड होता. कॉमर्सची डिग्री घेऊन त्याने सीए होण्याचे स्वप्न पाहिलं. सीएची इंटरमिजिएट एक्झामही त्याने क्लिअर केली, पण क्रिकेटमध्येही चांगली संधी मिळू लागल्याने त्याने सीए होण्याचे स्वप्न बाजूला सारले. तरीही उच्च शिक्षण घ्यायचेच या ध्येयाने त्याने फायनान्समध्ये एमबीए करून, आपले भविष्यही सेफ करून ठेवले.
रविचंद्रन अश्विन
नॉर्थ इंडियातील क्रिकेटर जास्त शिकलेले दिसत नाहीत. त्या तुलनेने साउथ इंडियातील सारेच क्रिकेटर आधी काहीतरी स्किल बेस्ड डिग्री घेऊन, क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी येतात. सध्या जगातील सर्वात अनुभवी स्पिनर असलेला रविचंद्रन अश्विन त्यापैकीच एक. अश्विन किती हुशार आहे याचा प्रत्यय आपल्याला ग्राउंडवर येतो. आज क्रिकेटमध्ये टॉपला असलेल्या अश्विनने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बी टेक केलंय. क्रिकेटर नसता तर तो एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पोस्टवर नक्कीच बसलेला दिसला असता.
वरुण चक्रवर्ती
अश्विनप्रमाणेच तामिळनाडूतून आलेला टीम इंडियाचा नवा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा देखील वेल एज्युकेटेड. तसं तर अश्विन आणि वरून एकाच कॉलेजचे विद्यार्थी. वरूनन सतराव्या वर्षी क्रिकेटमध्ये काही भविष्य दिसेना म्हणत क्रिकेट सोडायचा निर्णय घेतला. त्याने आर्किटेकची डिग्री घेतली आणि आर्किटेक बनला. दोन वर्षे आर्किटेकची नोकरी केल्यानंतर तो पुन्हा क्रिकेटकडे वळाला आणि तिथेच रमला. तो टीम इंडियासाठी वर्ल्डकपही खेळला. आयपीएलमध्ये केकेआरसाठी खेळताना त्याने आपला आर्किटेकची नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर
मागं-पुढं न बघता, जेव्हा विराट गेलेला गंभीरच्या अंगावर धावून, नेमंक काय घडलं होतं?