जर्मनीचा एकेकाळचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर… हिटलर इतका निर्दयी हुकूमशहा होता की, तो लोकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवायचा. तुम्ही म्हणणार महा स्पोर्टस वाल्यांना आज हिटलरची आठवण का झाली?, पण हिटलरची आठवण व्हायला एका प्लेअरनं कारण दिलय. जगातली सर्वात ग्रँड टी२० लीग गाजवत असलेल्या जोस बटलरने. जसा हिटलर साऱ्यांना आपल्या तालावर नाचवायचा, तसा आता बटलर आयपीएलमध्ये साऱ्या बॉलर्सला नाचवतोय. आज त्याच जोसने आपली ‘बटलरशाही’ कशी सुरू केली. याबद्दल जाणून घेऊ…
जोस बटलर इंग्लंडचा. इंग्लंड म्हणजे क्रिकेटचं माहेरघर. त्यामुळे त्याला लहानपणापासून क्रिकेटच बाळकडू मिळालं. त्याच्या एका बालपणीच्या किश्शाने आपण सुरुवात करू. टॉन्टनचा रहिवासी असलेला जोस १९९९ वर्ल्डकपमध्ये इंडिया श्रीलंका मॅच पहायला गेला. ही तीच मॅच जिच्यात द्रविड-गांगुलीने वर्ल्ड रेकॉर्ड पार्टनरशिप केलेली, तर ती मॅच पाहायला गेलेल्या जोसने बाउंड्रीवर उभे असलेल्या अरविंद डिसिल्वाकडे ऑटोग्राफ मागितला. त्याने जोसकडून पेन पेपर घेतला आणि ऑटोग्राफ दिला, पण डिसिल्वा त्याचा पेन घेऊन पुढे निघून गेला आणि जोसने मोठ्याने रडायला सुरुवात केली.
जोस शाळेत क्रिकेट आणि हॉकी खेळायचा. जोस दोन्हीत बॉस होता. पुढे हॉकी मागे राहिली आणि तो फुल टाइम क्रिकेटर झाला. सॉमरसेट काऊंटीन त्याचं फ्यूचर बनवायचं शिवधनुष्य पेलले. अगदी शाळेपासून सीनियर लेव्हलपर्यंत तो त्यांच्यात संघात राहिला. नॅशनल टीममध्ये यायला त्याला स्पर्धा करावी लागली तिही सॉमरसेटचाच विकेटकिपर पार्टनर क्रेग किस्वेटरसोबत, पण किस्वेटरच नाहीतर जॉनी बेअरस्टो यालाही मागे टाकत तो, २०१३ ला लिमिटेड ओव्हर्समध्ये टीमचा फर्स्ट चॉईस विकेटकिपर बनला.
हेही पाहा- आयपीएलचा नवा सुपरस्टार जोस बटलर कसे मिळाले मोठे यश?
सन २०१५ला इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला. टीम वर्ल्डकपच्या पहिला राऊंडला बाहेर झाली. बोर्डाने मोठे डिसिजन घेतले. बटलर टीमचा व्हाईस कॅप्टन झाला. ओएन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, जो रूट टीमचे फोर पिलर्स बनले.
इतर इंग्लिश प्लेयर आयपीएलपासून लांब पळत असताना बटलरने आयपीएलला प्राधान्य दिले. दोन वर्ष मुंबई इंडियन्ससाठी त्याने दोन वर्ष जोरदार परफॉर्मंस दिला, पण मुंबईन त्याला रिटेन केलं नाही आणि पुढच्या वर्षी ऑक्शनमध्ये तो राजस्थान रॉयल्समध्ये गेला. त्या २०१८च्या सीझनला राजस्थानसाठी तो फिनिशरची जबाबदारी सांभाळत होता, पण दिल्ली विरुद्धच्या मॅचला पाऊस आला आणि बटलरने रनांचा पाऊस पाडला. त्या दिवसापासून आजतागायत बटलर आयपीएलचा बेस्ट ओपनर बनलाय यात वादच नाही.
सन २०१९ला त्याचं सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झालं वर्ल्डकप जिंकायचं. आधी मॅच बनवणारी हाफ सेंचुरी केली. सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग केली आणि अखेरीस वर्ल्डकप विनिंग मोमेंट त्याच्या नावे झाली. इंग्लंड वर्ल्डकप जिंकताना सुपर ओवरच्या लास्ट बॉलला मार्टिन गप्टिलला रनआउट केले. बटलरने रन आउट केलेला तो क्षण त्यावर्षीच्या विस्डेनच्या कव्हरवर छापला गेला.
एकीकडे मायकल वॉन इंग्लंडच्या प्लेयर्सचा खेळ आयपीएलमुळे खराब झाल्याचं म्हणतो, अन् बटलर आपल्या आजवरच्या यशाचे श्रेय आयपीएलला देतो. दरवर्षी धमाकेदार खेळ दाखवणारा बटलर यावर्षी त्याच्या अल्ट्रा प्रो मॅक्स व्हर्जनमध्ये दिसतोय. सात मॅचमध्येच तीन शतक करत पाचशे रनांच्याजवळ गेला. आयपीएल २०२२च्या तो एकाच सीझनमध्ये त्याने डेविड वॉर्नरच्या ८४८ रनांचा विक्रम मोडत ८६३ धावा चोपल्या.
बटलर सध्या जगातील सर्वोत्तम टी२० बॅटर आहे यात वादच नाही. त्याचे आदर्श एमएस धोनी त्याला एबी डिव्हिलियर्स. एकदम त्यांच्यासारखाच त्याचा खेळ आणि त्यांचे व्यक्तिमत्व बटलरमध्ये दिसतंय. जगात बटलरचे फॅन्स सगळीकडे सापडतील पण हेटर्स एकही नाही. नेहमी शांत, हसतमुख आणि क्रिकेटच्या स्पिरिटला कुठेही धक्का न लागू देणार वर्तन त्याच्याकडून नेहमी घडतं. लोकांनी हिटलरची हिटलरशाही नाकारली, पण साऱ्याच क्रिकेट फॅन्सला बटलरचीही ‘बटलरशाही’ अशीच अव्याहतपणे पाहायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागं-पुढं न बघता, जेव्हा विराट गेलेला गंभीरच्या अंगावर धावून, नेमंक काय घडलं होतं?
कहाणी ‘दादा’लाच केकेआरमधून बाहेर काढण्याची, काय होतं गांगुलीला संघातून काढण्यामागील कारण
शंभर नाही, तर दीडशेहून अधिक मॅच खेळले, पण कर्णधार पदापासून नेहमीच वंचित राहिले ‘हे’ भारतीय खेळाडू
लईच वाईट राव! ५ विस्फोटक भारतीय खेळाडू, पण त्यांच्या नशिबात वर्ल्डकपची एकही मॅच नव्हती






