पुणे, 16 ऑगस्ट 2023: सनी स्पोर्ट्स किंग्डम, सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जतीन सराफ,कायरा रैना, समीहन देशपांडे, श्रावणी आर्डे, विहान मुर्ती, सफा शेख, आदित्य पाटील, प्राजक्ता गायकवाड, आयुश कमल यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 11 वर्षांखालील मुलांच्या गटात जतीन सराफने अतिक्ष अग्रवालचा 15-8, 15-11 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. तर मुलींच्या गटात कायरा रैनाने दिविशा सिंगचा 15-11, 15-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 13 वर्षांखालील मुलांच्या गटात समीहन देशपांडेने रेयाश चौधरीचा 15-11, 16-14 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. तर मुलींच्या गटात श्रावणी आर्डे हिने सान्वी पाटीलचा 15-7, 10-15, 15-6 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत विहान मूर्तीने वरद लांडगेचा 15-10, 15-8 असा तर, मुलींच्या गटात सफा शेखने संस्कृती जोशीचा 17-15, 15-10 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात आदित्य पाटील याने चैतन्य परांडेकरचा 15-9, 15-11 असा तर, मुलींच्या गटात प्राजक्ता गायकवाड हिने पूर्वा वळवंडेचा 15-12, 15-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.19 वर्षांखालील मुलांच्या गटात आयुश कमलने दिव्यांश सिंगचा 10-15, 15-7, 15-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
दुहेरीत अंतिम लढतीत 15 वर्षांखालील मिश्र गटात ईशान लागूने आयुशी काळेच्या साथीत आदित्य पोतनीस व श्रुतिका ढवळे यांचा 15-7 15-13 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. दुहेरीत अंतिम फेरीत 13 वर्षांखालील मुलांच्या गटात आयुश अग्रवालने जतीन सराफच्या साथीत रिहान हंसदा व रुपांश दास यांचा 15-6, 15-12 असा तर, मुलींच्या गटात रुद्रानीराजे निंबाळकर व तेजस्वी भुतडा यांनी नाविका जैन व श्रावणी आर्डे यांचा 16-14, 13-15, 15-6 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. 15वर्षाखालील मुलांच्या गटात अवनिश बांगर व वरद लांडगे या जोडीने सहज शर्मा व स्वयम् शर्मा यांचा 15-7, 15-8 असा तर, मुलींच्या गटात आयुशी काळे व आयुशी मुंडे यांनी आर्या कुलकर्णी व मधुरा काकडे यांचा 15-11, 15-10 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
15 वर्षांखालील मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत ईशान लागू व आयुशी काळे यांनी आदित्य पोतनीसव श्रुतिका ढवळे यांचा 15-7 15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सनीज वर्ल्डच्या संचालिका मधुरा निम्हण, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव आणि झेनेटिक स्पोर्ट्सचे संचालक नरेंद्र पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिजित मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:11 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
जतीन सराफ वि.वि.दियान पारेख 15-10, 15-3;
अतिक्ष अग्रवाल वि.वि.खुश दीक्षित 17-15, 15-7;
अंतिम फेरी: जतीन सराफ वि.वि.अतिक्ष अग्रवाल 15-8, 15-11;
11 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
कायरा रैना वि.वि.धनी झलावडिया 15-7, 13-15, 15-6;
दिविशा सिंग वि.वि.गार्गी कामठेकर 15-12, 15-12;
अंतिम फेरी: कायरा रैना वि.वि.दिविशा सिंग 15-11, 15-6;
13 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
समीहन देशपांडे वि.वि.सौरिश काणे 15-7, 13-15, 15-12;
रेयश चौधरी वि.वि.अनय एकबोटे 15-13, 17-15;
अंतिम फेरी: समीहन देशपांडे वि.वि.रेयाश चौधरी 15-11, 16-14;
13 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
श्रावणी आर्डे वि.वि.शर्वरी सुरवसे 13-15, 15-13, 15-9;
सान्वी पाटील वि.वि.रुद्रानीराजे निंबाळकर 15-12, 9-15, 15-13;
अंतिम फेरी: श्रावणी आर्डे वि.वि.सान्वी पाटील 15-7, 10-15, 15-6;
15 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
विहान मूर्ती वि.वि.सलील मणेरी 7-15, 15-11, 15-13;
वरद लांडगे वि.वि.ईशान लागू 16-14, 11-15, 15-10;
अंतिम फेरी: विहान मूर्ती वि.वि.वरद लांडगे 15-10, 15-8;
15 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
संस्कृती जोशी वि.वि.शर्वरी सुरवसे 15-12, 11-15, 15-6;
सफा शेख वि.वि.आयुशी काळे 16-14, 15-12;
अंतिम फेरी: सफा शेख वि.वि.संस्कृती जोशी 17-15, 15-10;
17 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
चैतन्य परांडेकर वि.वि.स्वानंद पाटणे 15-13, 15-10;
आदित्य पाटील वि.वि.विहान मूर्ती 15-8, 15-5;
अंतिम फेरी: आदित्य पाटील वि.वि.चैतन्य परांडेकर 15-9, 15-11;
17 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
पूर्वा वलवंडे वि.वि.सफा शेख 15-13, 11-15, 15-11;
प्राजक्ता गायकवाड वि.वि.आयुशी काळे 15-8, 15-11;
अंतिम फेरी: प्राजक्ता गायकवाड वि.वि.पूर्वा वळवंडे 15-12, 15-4;
19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
दिव्यांश सिंग वि.वि.वात्सल्य गर्ग 10-15, 15-13, 20-18;
आयुष कमल वि.वि.स्वानंद पाटणे 15-12, 15-6;
अंतिम फेरी: आयुश कमल वि.वि.दिव्यांश सिंग 10-15, 15-7, 15-5;
दुहेरी: अंतिम फेरी:
13 वर्षांखालील मुले:
आयुश अग्रवाल/जतीन सराफ वि.वि.रिहान हंसदा/रुपांश दास 15-6, 15-12;
13वर्षांखालील मुली:
रुद्रानीराजे निंबाळकर/तेजस्वी भुतडा वि.वि.नाविका जैन/श्रावणी आर्डे 16-14, 13-15, 15-6;
15वर्षाखालील मुले: अवनिश बांगर/वरद लांडगे वि.वि.
सहज शर्मा/स्वयम् शर्मा 15-7, 15-8;
15 वर्षांखालील मुली: आयुशी काळे/आयुशी मुंडे वि.वि.आर्या कुलकर्णी/मधुरा काकडे 15-11, 15-10;
17 वर्षांखालील मुले: आदित्य पाटील/चैतन्य परांडेकर वि.वि.अवनिश बांगर/वरद लांडगे १५-२, १५-७;
17 वर्षांखालील मुली: रिधिमा जोशी/शर्वरी सुरवसे वि.वि. प्राजक्ता गायकवाड/श्रावणी आर्डे 15-8, 21-19;
15 वर्षांखालील मिश्र दुहेरी: अंतिम फेरी:
ईशान लागू/ आयुशी काळे वि.वि.आदित्य पोतनीस/श्रुतिका ढवळे 15-7 15-13;
17 वर्षांखालील मिश्र दुहेरी: देव विरमणी/आरोही पाटील वि.वि.शौर्य पाटील/रीत पाल 15-7, 15-12.






