पुणे: पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15 संघाने कानिफनाथ क्रिकेट क्लब अ संघाचा तर आर्य स्पोर्टस् संघाने प्रदिपदादा कंद स्पोर्टस् क्लब संघाचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
लेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सौरभ दळवीच्या नाबाद 38 धावांच्या बळावर एल्व्हन स्टार बारामती 15 संघाने कानिफनाथ क्रिकेट क्लब अ(पुरंदर) संघाचा 9 गडी राखत दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मोईन भागवत व प्रविण भोसले यांच्या अचूक गोलंदाजीने कानिफनाथ क्रिकेट क्लब अ(पुरंदर) संघाचा डाव 6 षटकात 5 बाद 55धावांत रोखला. 55 धावांचे लक्ष सौरभ दळवीच्या नाबाद 38 धावांसह एल्व्हन स्टार बारामती 15 संघाने केवळ 4.2 षटकात 1 बाद 58 धावा करून सहज पुर्ण करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. सौरभ दळवी सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत निळकंठ पवारच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर आर्य स्पोर्टस् शिवसैनिक संघाने प्रदिपदादा कंद स्पोर्टस् क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
संपुर्ण जिल्ह्याच्या अंतिम फेरीच्या स्पर्धा रविवार,दिनांक 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी 09.30 वा. आदरणीय शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सृजन चषकाचे अनावरण व लेजेंडस क्रिकेट ग्राउंडचे उदघाटन करण्यात येणार असून सायंकाळी 06.30 वाजता अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे लाडके अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
कानिफनाथ क्रिकेट क्लब अ(पुरंदर)- 6 षटकात 5 बाद 55धावा (तेजश साबळे 13, कैलास घाटे नाबाद 10, मोईन भागवत 2-13, प्रविण भोसले 2-15, अभिजीत एकशिंगे 1-17) पराभूत वि एल्व्हन स्टार बारामती 15- 4.2 षटकात 1 बाद 58 धावा(सौरभ दळवी नाबाद 38, दिपक कुदळे 9, राहुल काटके 1-17) सामनावीर- सौरभ दळवी
एल्व्हन स्टार बारामती 15 संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.
प्रदिपदादा कंद स्पोर्टस् क्लब- 6 षटकात 8 बाद 44 धावा( अमित तपकीर 26, शुभम तळेकर 24, निळकंठ पवार 3-8, प्रशांत चौधरी 2-12) पराभूत वि आर्य स्पोर्टस् शिवसैनिक- 3.1 षटकात 1 बाद 50 धावा(राजेंद्र पानेसर नाबाद 21, वौभव पांडूले नाबाद 26, शुभम तळेकर 1-11) सामनावीर- निळकंठ पवार
आर्य स्पोर्टस् शिवसैनिक संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.