आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज डीन एल्गारने नाबाद शतक केले आहे. या शतकाबरोबरच त्याने आज एका खास विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
त्याने आज २८४ चेंडूत २० चौकार आणि १ षटकारासह नाबाद १४१ धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा नाबाद राहण्याची कामगिरी केली आहे. याआधी फक्त विंडीजचे सलामीवीर फलंदाज डेसमंड हेन्स यांनी अशी कामगिरी केली आहे. ते सुद्धा सलामीवीर फलंदाज म्हणून त्यांच्या कसोटी कारकिर्दीत तीन वेळा नाबाद राहिले आहेत.
एल्गारने आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून ४८ कसोटी सामने खेळले असून यात त्याने ४२.७७ च्या सरासरीने ११ शतके आणि ११ अर्धशतकांसह ३०८० धावा केल्या आहेत.
द. आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊन येथे सुरु असून आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने एल्गारचे नाबाद शतक आणि एबी डिव्हिलियर्सचे अर्धशतक यांच्या जोरावर सर्वबाद ३११ धावा केल्या आहेत.
तसेच ऑस्ट्रेलिया सध्या खेळत असून २९ षटकात त्यांनी ३ बाद १३० धावा केल्या आहेत. त्यांचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅंक्रोफ्ट आणि शॉन मार्श नाबाद खेळत आहे.