---Advertisement---

LSG vs MI: ‘हा’ खेळाडू ठरला मुंबईसाठी कर्दनकाळ, एकतर्फी सामना फिरवला

On: शनिवार, एप्रिल 5, 2025 7:22 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 च्या हंगामातील 16वा सामना लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाने 12 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 203 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकांत फक्त 191 धावा करता आल्या.

मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजी कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, मिचेल मार्शने मोलाची कामगिरी केली. त्याने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर संघाने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला त्याने 31 चेंडूत 60 धावा केल्या. ज्यात 9 चाैकार व 2 षटकारांचा समावेश होता.

मार्शशिवाय एडेन मार्करामने 53 धावांची खेळी खेळली. या दोघांच्या जोरावर संघाने 20 षटकांत 203 धावांचा टप्पा गाठला. मुंबई इंडियन्ससाठी, त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याची चेंडूतील हुशारी या सामन्यात दिसून आली, ज्याने 5 विकेट्स घेतल्या. या विजयासह, लखनऊ संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे, तर मुंबई इंडियन्स संघ सातव्या स्थानावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---