प्रमोशन फेरीत सातव्या क्रमांकावर असलेला पुणे पलानी टस्कर्स विरुद्ध रेलीगेशन फेरीतील दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला पालघर काझीरंगा रहिनोस यांच्यात एलिमीनेटर 1 चा सामना झाला. पालघर संघाकडून राहुल सवर व राज साळुंखे आक्रमक सुरुवात करत संघाला आघाडी मिळवून दिली. ऋषिकेश दळवीच्या भक्कम बचावाने पालघर संघाने पुणे संघाला ऑल आऊट करत सामन्यात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पुणे संघाकडून भूषण तपकीर व आर्यन राठोड यांनी चांगला प्रतिकार देत होते.
पालघर संघाने चढाईत व पकडीत सांघिक खेळाचे प्रदर्शन करत मध्यांतराला 20-12 अशी निर्यायक आघाडी मिळवली होती. मध्यांतरा नंतर ही पालघर संघाने आक्रमक खेळ सुरू ठेवला. मध्यांतरा नंतर पालघर संघाची बचावफळी अधिकच आक्रमक खेळ दाखवत होती. हर्ष मेहेर, सर्वेश फटकारे व ऋषिकेश दळवी यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. 31-22 अशी आघाडी पालघर कडे असताना भूषण तपकीर ने सुपर रेड करत सामन्यात चुरस आणली. पुणे संघाने पालघर संघाला ऑल आऊट करत पिझाडी 28-32 अशी कमी केली.
सामन्यात शेवटचे दोन मिनिटं शिल्लक असताना भूषण तपकीर ने पुन्हा एकदा सुपर टेन करत 32-32 असा त्यानंतर मात्र पालघर चा राहुल सवर विरुद्ध पुणे चा भूषण तपकीर असा सामना बघायला मिळाला. अंत्यत रोमचंक झालेला सामना 35-35 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर अतिरिक्त 3-3 मिनिटांच्या खेळात पालघरच्या राहुल सवर ने पहिल्याचा रेड मध्ये 4 गुणांची सुपर रेड मारत पालघर संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भूषण तपकीर ची जबरदस्त पकड करत सामना पालघरच्या बाजूने केला. पालघर संघाने 44-41 असा सामना जिंकला. पालघर संघाकडून राहुल सवर ने 18 व तर पुणे कडून भूषण तपकीर ने 18 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- राहुल सवर, पालघर व भूषण तपकीर, पुणे
बेस्ट डिफेंडर- हर्ष मेहेर, पालघर काझीरंगा रहिनोस
कबड्डी का कमाल- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RRvCSK: रॉयल्सच्या पारड्यात नाण्याचे नशीब, सीएसकेला गोलंदाजीचे आमंत्रण
WTC Final आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयाने ऑस्ट्रेलिया खुश