बुधवारी (दि. 24 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी 7 वाजता लखनऊ विरुद्ध मुंबई संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ एक बदलासह सामन्यात उतरणार आहे. कुमार कार्तिकेय संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी ऋतिक शोकीन याची संघात एन्ट्री झाली आहे.
🚨 Toss Update 🚨
Mumbai Indians win the toss & elect to bat first against Lucknow Super Giants.
Follow the match ▶️ https://t.co/CVo5K1w8dt#TATAIPL | #Eliminator | #LSGvMI pic.twitter.com/UTtHTIMl9h
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
हंगामातील कामगिरी
आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाने 14 सामने खेळले. त्यापैकी 8 सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले, तर 5 सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. उर्वरित 1 सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे त्याचा त्यांना 1 गुण मिळवला. साखळी फेरी संपल्यानंतर लखनऊ 17 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी राहिला आणि एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी पात्र ठरला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघानेही 14 सामने खेळताना 8 सामने जिंकले, तर उर्वरित 6 सामन्यात पराभव पत्करला. त्यामुळे त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले. आता एलिमिनेटर सामन्यात (Eliminator Match) लखनऊ विरुद्ध मुंबई (Lucknow vs Mumbai) संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा सामना करण्याचा प्रयत्न करतील. (eliminator Mumbai Indians have won the toss and have opted to bat against Lucknow Super Giants)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स
आयुष बदोनी, दीपक हुड्डा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसिन खान
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, ऋतिक शोकीन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदानावर जल्लोष, तर लिफ्टमध्ये डान्स! CSKने फायनल गाठताच युवा खेळाडूंसोबत थिरकला ब्रावो, Video पाहाच
टी20त घडला इतिहास! भारतीय मूळ असलेल्या ‘या’ धुरंधराने 49 चेंडूत ठोकल्या 144 धावा, टोटल होती 324