सध्या इंग्लंडमध्ये पुरुष ऍशेस मालिकेसोबतच महिलांची ऍशेस देखील सुरू आहे. गुरुवारी (22 जून) महिला ऍशेसमधील एकमात्र कसोटी सामना नॉटिंघममध्ये सुरू झाला. ऑस्ट्रेलियन दिग्गज एलिस पेरी या सामन्याच चांगल्या फॉर्ममध्ये होती मात्र शतकाला अवघी एक धाव कमी असताना तिने विकेट गमावली. कसोटी क्रिकेटमध्ये 99 धावांवर बाद होणारी पेरी इतिहासातील चौथीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) महिला संघांमधील ऍशेस (Women’s Ashes 2023) मालिकेत एक कसोटी, तीन टी-20 आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. मालिकेची सुरुवात कसोटी सामन्याने झाली. पहिल्याच दिवसी ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली आणि संघाला चांगली सुरुवात देखील मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 8 बाद 328 धावा केल्या. यात एलिस पेरी (Ellyse Perry) हिचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. तिने 153 चेंडू खेलून 99 धावा केल्या आणि नेट सायव्हर ब्रांटच्या हाता झेलबाद झाली. यावेळी लॉरेन फायलर गोलंदाजी करत होती.
Ellyse Perry falls for 99!
The Australian star chips a catch to Nat Sciver-Brunt just one short of her third Test century.
📝 #ENGvAUS: https://t.co/w2dM92Ku8E pic.twitter.com/jikKqv07sO
— ICC (@ICC) June 22, 2023
पेरीच्या आधीत ऑस्ट्रेलियन संघाच्या दोन आणि इंग्लंडची एक महिला खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये 99 धावांवर बाद झाल्या होत्या. इंग्लंडची बेट्टी स्नोबॉल कसोटी क्रिकेटमध्ये अवघी एक धाव कमी पडल्यामुळे शतक न करू शकलेली पहिली महिला खेळाडू आहे. 1937मध्ये तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 99 धावांवर विकेट गमावली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची जिल केनारे 1984 मध्ये आणि जेस जॉनासन 2015 मध्ये 99 धावांच्या वैयक्तिक खेळीवर बाद झाले होते.
This is what 💔 looks like 😰 @EllysePerry#WomensAshes #WomensAshesonFanCode pic.twitter.com/743KXO6g4q
— FanCode (@FanCode) June 22, 2023
2008 साली ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या ऍलिस पेरीसाठी हा सामना ऐतिहासिक आहे. पेरी 10 ऍशेस मालिका खेळणारी पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. सामन्याचा एकंदरीत विचार ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ताहलिया मॅकग्राथ हिने पेरीची चांगली साथ दिली. मॅकग्राथने 83 चेंडूत 61 धावांची खेळी केली आणि पेरीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे इंग्लंडसाठी सोफिया एक्लेस्टन हिने 3, तर लॉरेन फायलर हिने 2 विकेट्स घेतल्या. (Ellyse Perry has not been able to score a century after falling short by one run)
महत्वाच्या बातम्या –
फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजावर आयसीसीकडून बंदी, वाचा वर्ल्ड कप क्वॉलिफायर सामन्यात काय घडलं
6, 6, 6, 6, 6 । इंग्लिश फलंदाजाची वादळी खेळी, आरसीबी कॅम्पमध्ये आनंदाची लाट