---Advertisement---

आयसीसी पुरस्कारांवर वर्चस्व गाजवणारी एलिसा पेरी म्हणाली, ‘इतरही उत्तम महिला टी20 खेळाडू आहेत, पण…’

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 7:38 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी (२८ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा बघायला मिळत आहे. विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित केले आहे तर, एमएस धोनीला वनडे व टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

यादरम्यान महिला क्रिकेटमध्ये मानाचा समजला जाणारा दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने पटकवला आहे. एवढेच नाही तर तिने सर्वोत्तम महिला टी२० आणि वनडे क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळवला आहे.  पुरस्कार मिळाल्यानंतर पेरीने समाधान व्यक्त केले असून, महिला क्रिकेटची झालेली भरभराट तिच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब आहे .

पुरस्कार मिळाल्यानंतर पेरीने प्रतिक्रिया दिली, ‘निश्चितच मागील दशकामध्ये टी२० क्रिकेटचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. विशेषतः जेव्हा महिलांच्या टी२० क्रिकेटला सुरुवात झाली, तेव्हापासून ते आतापर्यंतची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे. महिला बिग बॅश लीगसारख्या स्पर्धांमुळे युवा महिला खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळाली आहे. खरंतर माझ्यामध्ये इतरही उत्तम महिला टी२० खेळाडू आहेत, पण निश्चितच हा गौरव मला मिळाल्याने आनंद होत आहे.’

एलिसा पेरीने या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४३४९ धावा केल्या आहेत. यात तिच्या वनडेत ६८.९७च्या सरासरीने केलेल्या २६२१ धावांचा आणि टी२०त ३०.३९च्या सरासरीने केलेल्या ११५५ धावांचा समावेश आहे. सोबतच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २१३ विकेट्स घेतल्या आहेत. यात वनडेतील ९८ विकेट्स आणि टी२० तील ८९ विकेट्सचा देखील समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

नया है ये…! न्यूझीलंडच्या प्रेक्षकाने चक्क स्वतः बनवला पाकिस्तानी खेळाडूंच्या चुकांचा स्कोर बोर्ड

तुझं वजन जरा २० ते २५ किलो जास्तच! वेडचे पंतला मजेदार स्लेजिंग, पाहा व्हिडिओ

अजबच आहे बाबा! बुमराहने स्टंपवरील बेल्स उडवल्या तरी स्मिथला तपास नाही, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---