नुतकाच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर याच्यासोबत लाजिरवाणा प्रकार घडला. वॉर्नरची पत्नी कँडिस हिने स्वतः याबाबत एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. कँडिसने दिलेल्या माहितीनुसार लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षारक्षकांनी वॉर्नरवर संशय घेतला होता. मात्र, सुदैवाने तसे काही नसल्यामुळे, त्यांना ऑस्ट्रेलियात येण्याची परवानगी मिळाली.
डेविड वॉर्नर (David Warner) याची पत्नी कँडिस () हिने सांगितल्याप्रमाणे लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा रक्षकांकडून स्कॅनिंग सुरू आहे. वॉर्नरची स्कॅनिंग करताना अचानक अलार्म वाजू लागले. त्यामुळे त्याला थांबवले आणि आतमध्ये नेले गेले. त्याच्या संपूर्ण शरीराची झडती घेतली गेली. तेव्हाही सुरक्षेसाठीचा स्कॅनर वॉर्नरच्या प्रायवेट पार्टजवळ हॉट स्पॉट असल्याचे सांगत होता. सायरन देखील सतत वाजत होता. दुसरीकडे कँडिस स्वतः मात्र कोणत्याच अडथळ्याशिवाय तिथून पुढे निघाली होती. मात्र, सलामीवीर फलंदाजाची कडक झडती घेतली गेली.
ऑस्ट्रेलियातील एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत कँडिसने हा खुलासा केला. वॉर्नरची पत्नी म्हणाली, “आजूबाजूचे सर्वजण हसत होते. त्यापैकी एका व्यक्तिला वॉर्नरवर संक्षय देखील होता. त्याच्या मते काहीतरी असल्यामुळेच मशीन आवाज करत आहेत. त्यानंतर सुरक्षारक्षक माझ्याकडे आला आणि म्हणाला, आम्हाला याकडे नीट पाहावे लागले, पण तरीही मला समजले नाही. त्याठिकाणी काय सुरू आहे आणि माझ्या पतीसोबत काय चालले आहे, याचा मला काही अंदाज नव्हता.” हा संपूर्ण प्रकार वॉर्नर आणि त्याच्या पत्नीसाठी नक्कीच लाजिरवाणा होता. मात्र, अखेर सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्ट झाले आणि वॉर्नर कुटुंबियांना ऑस्ट्रेलियात येते आले.
दरम्यान, वॉर्नर आपल्या कुटुंबासोबत अमेरिकी गायिका मायली सायरस हिची आहे आई टीश सायर आणि डोमनिक परसेल यांच्या लग्नासाठी उपस्थित राहिला होता. शनिवारी (19 ऑगस्ट) लॉस एंजेलिसच्या मालिबूमध्ये हा विवाह पार पडला. वॉर्नर कुटुंबीय या लग्नसाठी उपस्थित राहिले खरे, पण मायदेशात माघारी परतताना त्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, डेविड वॉर्नर सध्या भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या तयारीत आहे. 5 ऑक्टोबर पासून आयसीसी वनडे विश्वचषकात भारतातील 10 वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. आफ्रिकी संघाविरुद्ध होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असणार आहे. (Embarrassing incident with David Warner at Los Angeles International Airport! News related to Private Wart)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची आशिया चषकात विजयी सलामी, नवख्या नेपाळचा 238 धावांनी पराभव
“भारत-पाकिस्तान द्वंद्व ऍशेसपेक्षा सरस”, ऑसी दिग्गजाने दिली कबुली