अहमदाबाद। गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचे विजेतेपद मिळवले. रविवारी (दि. २९ मे) पार पडलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव केला. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेला हा सामना गुजरातने ७ विकेट्सने जिंकला आणि पहिल्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. असे असले, तरीही यंदाचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा म्हणजेच ‘एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला मिळाला.
हा पुरस्कार देण्यामागील नियम
हा पुरस्कार देण्यासाठी बीसीसीआयचे काही नियम आहेत. हा पुरस्कार त्याच खेळाडूंना दिला जातो, ज्यांचा जन्म १ एप्रिल, १९९४ नंतर झाला आहे. तसेच त्या खेळाडूने ५ किंवा त्यापेक्षा कमी कसोटी सामने किंवा २० किंवा त्यापेक्षा कमी वनडे सामने खेळलेले आहेत. तसेच त्या खेळाडूने २५ किंवा त्यापेक्षा कमी आयपीएल सामने खेळलेले असतील. तसेच, त्या खेळाडूने आधी हा पुरस्कार मिळवलेला नसेल.
यंदाच्या हंगामात हा पुरस्कार मिळणाऱ्या उमरान मलिक याने प्रभावी कामगिरी केली. त्याने १४ सामन्यांत २०.१८च्या सरासरीने आणि ९.०३च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या. या हंगामात २५ धावा देत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
या लेखातून आपण आत्तापर्यंतचे एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
आत्तापर्यंतचे एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकणारे खेळाडू –
२००८ – श्रीवत्स गोस्वामी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
२००९ – रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स)
२०१० – सौरभ तिवारी (मुंबई इंडियन्स)
२०११ – इक्बाल अब्दुल्ला (कोलकाता नाईट रायडर्स)
२०१२ – मनदीप सिंग (किंग्स इलेव्हन पंजाब)
२०१३ – संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)
२०१४ – अक्षर पटेल (किंग्स इलेव्हन पंजाब)
२०१५ – श्रेयस अय्यर (दिल्ली डेअरडेविल्स)
२०१६ – मुस्तफिजूर रेहमान (सनरायझर्स हैदराबाद)
२०१७ – बासिल थंपी (गुजरात लायन्स)
२०१८ – रिषभ पंत (दिल्ली डेअरडेविल्स)
२०१९ – शुबमन गिल (कोलकाता नाईट रायडर्स)
२०२० – देवदत्त पडीक्कल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
२०२१ – ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)
२०२२- उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)*
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएलची पर्पल कॅप डोक्यावर मिरवणारे गोलंदाज, चहल राजस्थानचा पहिला रॉयल खेळाडू