अहमदाबाद। रविवारी (दि. २९ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरात संघाने ७ विकेट्सने विजय मिळवत आयपीएलच्या त्यांच्या पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्याबरोबर आयपीएल २०२२ हंगामाचा शेवट झाला. या सामन्यानंतर हंगामातील उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यात मोस्ट व्हॅल्यूएबल पुरस्कार अर्थात मालिकावीराचा पुरस्कार राजस्थान रॉयल्स संघाचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर याला देण्यात आला.
आयपीएल २०२२ मधील बटलरची कामगिरी
जोस बटलर याने आयपीएल २०२२ हंगामात त्याने १७ सामने खेळताना ५७.५३च्या सरासरीने ८६३ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ शतके आणि ४ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने हा कारनामा राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध केला. त्याने नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळताना ३९ धावा चोपल्या होत्या. विशेष म्हणजे, आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तसेच, तो आयपीएल इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला.
आयपीएलच्या इतिहासात ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ पुरस्कार पटकावणारे खेळाडू
२००८ – शेन वॉटसन
२००९ – ऍडम गिलख्रिस्ट
२०१० – सचिन तेंडुलकर
२०११ – ख्रिस गेल
२०१२- सुनील नारायण
२०१३ – शेन वॉटसन
२०१४ – ग्लेन मॅक्सवेल
२०१५ – आंद्रे रसल
२०१६ – विराट कोहली
२०१७ – बेन स्टोक्स
२०१८ – सुनील नारायण
२०१९ – आंद्रे रसल
२०२० – जोफ्रा आर्चर
२०२१ – हर्षल पटेल
२०२२- जोस बटलर*
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएलची पर्पल कॅप डोक्यावर मिरवणारे गोलंदाज, चहल राजस्थानचा पहिला रॉयल खेळाडू