---Advertisement---

अर्रर्र, घरच्या मैदानावर पाकिस्तान गारद; करा’चीत’ इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

---Advertisement---

इंग्लंड पुरूष क्रिकेट संघाने पाकिस्तान दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडने पाकिस्तानला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 असे पराभूत केले. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvsENG) यांच्यात मालिकेतील तिसरा सामना कराचीमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये इंग्लंडने 8 विकेट्सने विजय मिळवला. हॅरी ब्रूक हा सामनावीर आणि मालिकावीर ठरला. पराभव झाल्याने मात्र पाकिस्तानच्या नावावर इतिहासात नकोश्या विक्रमाची नोंद झाली.

पकिस्तान प्रथमच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेमध्ये पराभूत झाला. पाकिस्तान पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकही सामना जिंकू शकला नाही. त्याचबरोबर त्यांनी कराचीमध्ये आतापर्यंत तीनच कसोटी सामने गमावले. या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर असून त्यांनी येथे 23 कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंडविरुद्ध त्यांचा पराभव झाल्याने क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या विजयामुळे इंग्लंड पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये व्हाईटवॉश देणारा पहिलाच संघ ठरला आहे.

या मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकत इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली होती. घरच्या मैदानावर नामुष्की टाळण्यासाठी पाकिस्तानला तिसरा सामना जिंकणे महत्वाचे होते. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियमध्ये खेळला गेला. 17 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्यांच्या चौथ्या दिवशी 38 मिनिटांतच पाहुण्या संघाने विजय मिळवला. तत्पूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात त्यांनी कर्णधार बाबर आझम याच्या 78 आणि आगा सलमान याच्या 56 धावांच्या जोरावर सर्व विकेट्स गमावत 304 धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात इंग्लंडने 354 धावा केल्या. यामध्ये हॅरी ब्रूक याने 111 धावा आणि ओली पोप याने 51 धावा केल्या. यामुळे इंग्लंडने 50 धावांची  आघाडी घेतली, मात्र पाकिस्तानला दुसऱ्या डावात 216 धावाच करता आल्या. यामुळे इंग्लंडला विजयासाठी 167 धावसंख्येचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन डकेट 82 आणि कर्णधार बेन स्टोक्स 35 धावा करत नाबाद राहिले.

पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड तब्बल 17 वर्षानंतर आला होता. त्याचबरोबर त्यांनी या दौऱ्यात सात सामन्यांची टी20 मालिकाही खेळली जी त्यांनी 4-3 अशी जिंकली. इंग्लडचा हा कराचीत दुसराच कसोटी विजय ठरला. ENG beat PAK in Karachi Test and first time pakistan faced clean Sweep in Home soil

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA क्रमवारीनुसार ब्राझील पहिल्या स्थानावर, तर चॅम्पियन अर्जेंटिना…
मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली ‘अशी’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---