इंग्लंड दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड रविवारी (30 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाचवा आणि शेवटचा ऍशेस कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. ब्रॉडने सामन्याच्या तिसरा दिवसाखेर घोषणा केली की, हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. सामन्याच्या चौथ्या दिवशी ब्रॉड जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियन संघाकडून गार्ड ऑफ ऑनर दिला गेला.
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) इंग्लंड संघाच्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटणध्ये महान गोलंदाजांपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 600 पेक्षा जास्त विकेट्स अशून आंतरारष्ट्रीय विकेट्सचा आकडा 850च्या आसपास आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs aUS) यांच्यातील ऍशेस मालिकेत ब्रॉड नेहमीच निर्णायक भूमिका पार पाडत आला आहे. जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड यांची जोडी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम ठरली आहे. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या 9 बाद 389 धावा होती. चौथ्या दिवसी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन हे दोन्ही दिग्गज फलंदाजीसाठी मैदानात आले, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाकडून ब्रॉडला गार्ड ऑफ ऑनर मिळाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CvUUHtQt7et/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करताना ब्रॉड म्हणाला की, “उद्या (रविवार, 30 जुलै) किंवा सोमवारी (31 जुलै) माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना संपेल. हा प्रवास अप्रतिम होता.” ब्रॉडने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चाहत्यांसाठी हा धक्का मानला जात आहे. जगभरातील क्रिकेटचे जाणकार त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
ब्रॉड आणि अँडरसन जोडी ओव्हल कसोटीच्या शेवटच्या डावात चांगल्या प्रदर्शनाच्या प्रयत्नात असेल. कारण हा त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल, ज्यामध्ये दोघे एकत्र खेळणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच अँडरसन-ब्रॉडने शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा यांना पछाडत सर्वात यशस्वी कसोटी जोडीचा मान पटकावला होता. वॉर्न आणि मॅकग्रा यांनी सोबत खेळताना 1001 कसोटी विकेट्स घेतल्या होत्या, तर अँडरसन-ब्रॉड जोडीने 1037* कसोटी विकेट्स घेत यादीत पहिला क्रमांक पटकावला होता. विशेष म्हणजे अँडरसन रविवारी आपला 41 वा वाढदिवस साजरा करत असताना ब्रॉड शेवटचा सामना खेळत आहे.
मागच्या मोठ्या काळापासून अँडरसनच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, इंग्लंडच्या या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजाने अद्याव कसोटीची विचार केला नाही, असेच दिसते. जानेवारी 2024 मध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. अँडरसन या मालिकेत खेळण्यासाठी उत्सुक दिसत आहे. (???????????????????? ???????? ???????????????????????? for Stuart Broad as he walks out to bat one final time in his Test career)
महत्वाच्या बातम्या –
मॅचविनर कॅप्टनने सांगितलं भारताविरुद्ध विजयाचं सर्वात मोठं कारण; म्हणाला, ‘या सामन्यात आम्ही खूप…’
‘अँडरसन-ब्रॉडची जोडी नेहमी स्मरणात राहील’, द्रविडने सांगितले इंग्लिश दिग्गजाचे संघातील महत्व