---Advertisement---

मोईन अलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला लॅब्यूशेन, चेंडू मिस करताच झाला मोठा गेम, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जुलै 20, 2023 4:06 PM
Marnus-Labuschagne
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मॅनचेस्टर येथे खेळला जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला. अशात बुधवारपासून (दि. 19 जुलै) या संघांमध्ये चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतक झळकावणाऱ्या मार्नस लॅब्यूशेन याला मोईन अली याने तंबूत धाडलं. यावेळी लॅब्यूशेन ज्या पद्धतीने बाद झाला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कसा झाला बाद?
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 विकेट्स गमावत 299 धावा केल्या होत्या. यावेळी क्रीझवर शानदार पद्धतीने फलंदाजी करत असलेल्या मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) याला मोईन अली (Moeen Ali) याने बाद केले. खरं तर, आत येणारा चेंडू खेळण्यास लॅब्यूशेन चुकला आणि चेंडू थेट त्याच्या पॅडवर लागला.

मोईन अली ऑस्ट्रेलियाच्या डावातील 47वे षटक टाकत होता. यावेळी स्ट्राईकवर लॅब्यूशेन होता. मोईनने पहिला चेंडू टाकताच लॅब्यूशेन पायचीत झाला. फलंदाजाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यात तो अपयशी ठरला आणि चेंडू थेट त्याच्या पॅडला जाऊन लागला. यावेळी खेळाडूंनी अपील करताच, पंचांवर कोणताही फरक पडला नाही. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स याने रिव्ह्यूची मागणी केली. यामध्ये फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले. अशाप्रकारे लॅब्यूशेनला 115 चेंडू खेळून 51 धावात तंबूत परतावे लागले. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://twitter.com/englandcricket/status/1681673435053957120?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1681673435053957120%7Ctwgr%5E3db5a9003679c9279dc5e9f2fbd395e1b22778ec%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Feng-vs-aus-4th-test-marnus-labuschagne-lbw-by-moeen-ali-see-video-brmp%2F279825%2F

सामन्याची स्थिती
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्या संघाने 8 विकेट्स गमावत 299 धावा केल्या होत्या. यावेळी क्रीझवर मिचेल स्टार्क (23) आणि कर्णधार पॅट कमिन्स (1) नाबाद होते. मात्र, दुसऱ्या दिवशी 84 षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कमिन्स 1 धावेवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 88 षटकांच्या खेळानंतर 9 विकेट्स गमावत 313 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्यूशेनव्यतिरिक्त मिचेल मार्श यानेही 51 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तसेच, इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त स्टुअर्ट ब्रॉडने 2, मोईन अली, जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (eng vs aus 4th test batter marnus labuschagne lbw by moeen ali video goes to viral see here)

महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेत जाऊन पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी, भारत-इंग्लंडच्या विक्रमाला तडा
शाहरुख बनला विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर! व्हायरल फोटोनंतर आयसीसीने शेअर केला खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---