इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जाणारी ऍशेस मालिका जगभरात पाहिली जाते. बुधवारी (16 जून) ऍशेस 2023ची सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात जेम्स अँडरसन याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण रविवारी (18 जून) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अँडरसनला पहिले यश मिळाले. या विकेटच्या जोरावर त्याने कारकिर्दीतील मोठा टप्पा पार केला.
ऍशेस 2023 (Ashes 2023) च्या पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने आपला पहिला डाव अवग्या 78 षटकांमध्ये घोषित केला. संघाजी धावसंख्या 8 बाद 393 होती. पहिल्या दिवसातील काही षटकेही बाकी होती. पण तरीही इंग्लंडने डाव घोषित केला. संघाने घेतलेला हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 5 बाद 311 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा (126*) आणि ऍलेक्स कॅरी (52*) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू केला.
ख्वाचा आणि कॅरी वैयक्तिक शतक आणि अर्धशतक करून शनिवारी दिवसाचा शेवट केला होता. रविवारी देखील दोघांकडून मोठ्या भागीदारी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच सत्रात जेम्स अँडरसन (James Anderson) याने कॅरीचा त्रिफळा उडवला. या विकेटनंतर अँडरसनच्या कसोटी विकेट्सचा आकडा 686 झाला, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमद्ये तब्बल 1100 विकेट्स त्याने पूर्ण केल्या.
Jimmy Anderson. GOAT. ????
The King of Swing gets First Class wicket number 1️⃣1️⃣0️⃣0️⃣! ????
Alex Carey departs for 66.#EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/5oVD7jfKij
— England Cricket (@englandcricket) June 18, 2023
उभय संघांतील या सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर इंग्लंड आपल्या बॅझबॉल रणनीतीसह मैदानात उतरली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने डाव घोषित केला. पण ऑस्ट्रेलियन संघाच्या विकेट्स मात्र झटपड पडल्या नाहीत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांमधील लढत अधिकच रंजक होताना दिसली. (ENG vs AUS James Anderson completes 1,100 wickets in First Class cricket.)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: सात्विक-चिरागने इंडोनेशियात फडकावला तिरंगा, मानाची स्पर्धा जिंकत रचला इतिहास
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’