इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ऍशेस कसोटी सामना मॅनचेस्टरमध्ये खेळला जात आहे. गुरुवारी (20 जुलै) म्हणजेच मॅनचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा सलामीवर झॅक क्राउली याने दमदार खेळी करत शतक पूर्ण केले. अवघ्या 93 चेंडूत क्राउलीने 100 धावा कुटल्या. तो 189 धावांवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 317 धावांवर गुंडाळला गेला. 90.2 षटकात ऑस्ट्रेलियाने 317 धावा करून सर्वबाद झाला. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 8 बाद 299 धावा होती. म्हणजेच दुसऱ्या दिवसी अवघ्या 18 धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ सर्वबाद झाला. मिचेल स्टार्क 36 धावांसर शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम होता. मार्नस लॅबुशेन आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 51-51 धावांची खेळी केली.
दुसऱ्या दिवसी पहिल्याच सत्रात इंग्लंड संघ फलंदाजीला आला. इंग्लंडसाठी झॅक ग्राउली आणि बेन डकेत यांनी डावाची सुरुवात केली. क्राउलीने शतक करून संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र बेन डकेत अवघी एक धाव करून यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेच्या हातात झेलबाद झाला. मिलेच स्टार्कने त्याची विकेट घेतली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला मोईन अली (Moeen Ali) याने 82 चेंडूत 51 धावा केल्या आणि उस्मान ख्वाजा याच्या हातात झेलबाद झाला. मोईन अलीच्या कारकिर्दीतील हे 15 वे कसोटी अर्धशतक ठरले. झॅक क्राउली याच्या कसोटी कारकिर्दीतील हे अवघे चौथे शतक आहे. 14 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने या 100 धावा केल्या.
शतकानंतरही तो थांबला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण सुरू ठेवताना द्विशतकाकडे वाटचाल केली. मात्र, 189 धावांवर कॅमेरून ग्रीन याने त्याला बाद केले. त्याने बाद होण्यापूर्वी 182 चेंडूवर 189 धावा करताना 21 चौकार व 3 षटकार ठोकले.
(ENG vs AUS Manchester Test Hundred for Zak Crawley in 93 balls)
महत्वाच्या बातम्या –
पंतच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाला विश्वचषकात खेळायचाय, वेटलिफ्टिंगला केली सुरुवात
BREAKING! धर्मासाठी क्रिकेट कारकिर्दीची कुर्बानी! वयाच्या 18व्या वर्षी पाकिस्तानची टॉप ऑर्डर बॅटर निवृत्त