भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मागच्या सहा-सात महिन्यांपासून संघातून बाहेर आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. अपघातात झालेल्या दुखापतीतून तो अद्याप सावरला नाहीये. पण येत्या काही महिन्यांमध्ये पंत पुन्हा एकदा भारतासाठी मैदान गाजवताना दिसू शकतो. यष्टीरक्षक फलंदाजाने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओत आपली फिटनेस बऱ्यापैकी परत मिळवल्याचे दिसत आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा अपघात झाला, तेव्हा तो अक्षरशः चालूही शकत नव्हता. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. सोबतच संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी दुखापत झाली होती. अपघातात पंतची महागडी गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने त्याने गाडी पेटण्याआधीच बाहेर उडी मारली होती. भारतीय क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का होता. डिसेंबर 2022च्या शेवटच्या आढवड्यात त्याला ही दुखापत झाली होती. पण अद्याप तो मैदानात पुनरागमन करू शकला नाही.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंत चाहत्यांसाठी वेळोवेळी स्वतःविषयी माहिती देत असतो. गुरुवारी (20 जुलै) त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये पंत जिममध्ये वजन उचलताना दिसत आहे. व्हिडिओत तो दुखापतीतून बऱ्यापैकी सावरल्याचे दिसते. एखाद्या फिट व्यक्तीप्रमाणे पंत हे वजन उचलत आहे. असे असले तरी, भारतीय संघात जागा मिळवण्याइतपत फिटनेस मिळवण्यासाठी त्याचा अजून बरीच महेनत घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, पंतच्या अनुपस्थिती भारतीय संघाला चांगलाच तोटा झाल्याचे दिसले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंतची कमरतचा भारतीय संघाला जाणवली. पंतच्या अनुपस्थितीत भारताने डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारला. सध्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत ईशान किशन आणि केएस भरत हे दोन यष्टीरक्षकांचे पर्याय संघाकडे आहेत. तर वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसन संघात सामील होणार आहे.
पंत सध्या बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहेत. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक खेळला जाणार आहे. पण भारतात होणाऱ्या या वनडे विश्वचषकात पंत खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे. कारण तोपर्यंत पंत आपली पूर्ण फिटनेस मिळवेल, याची शक्यता फारच कमी आहे. (In Rishabh Pant’s new video, he is seen doing weight lifting in the gym.)
महत्वाच्या बातम्या –
द्रविड म्हणतोय, “वेस्ट इंडीज क्रिकेटला पुन्हा वैभव प्राप्त होईल पण…”
आशिया चषकाचे चित्र होऊ लागले स्पष्ट, भारतासाठी ‘हा’ खेळाडू करणार विकेटकीपिंग