---Advertisement---

ट्रॅव्हिस हेडच्या वादळासमोर इंग्लंड ढेर; कांगारुंचा एकतर्फी विजय!

---Advertisement---

ऑस्टेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी20 मालिकेनंतर आता वनडे मालिका खेळवली जात आहे. टी20 मालिका बरोबरीत सुटली होती.  निर्णायक तिसरा टी20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. तिसऱ्या सामन्यापूर्वी मालिका 1-1 ने बरोबरीमध्ये होती. दरम्यान आता नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 315 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 44 व्या षटकातच लक्ष्य गाठले. भारताविरुद्ध 2023 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडची बॅटही या सामन्यात चांगलीच बोलली. त्याने या सामन्यात त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली.

ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेड शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 129 चेंडूत 154 धावांची नाबाद खेळी खेळली. याआधी त्याची सर्वात मोठी खेळी 152 धावांची होती. या खेळीत त्याने 20 चौकारांसह 5 षटकार मारले. आपला 66 वा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या हेडने 92 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीतील हे सहावे शतक ठरले. हेडने चौथ्या विकेटसाठी मार्नस लॅबुशेनसोबत 148 धावांची अभेद्य भागीदारी केली. या दोघांनी अवघ्या 107 चेंडूत या धावा जोडल्या. लॅबुशेनने 61 चेंडूत 77 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर गोलंदाजी करताना इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने 6 षटकांत 53 धावा दिल्या तर लियाम लिव्हिंगस्टोनने 9 षटकांत 75 धावा दिल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 315 धावा केल्या. बेन डकेटशिवाय विल जॅकने 62 धावांची खेळी केली. 25व्या षटकात जॅक बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 168 धावा होती. येथून ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत इंग्लंडला 315 धावांवर रोखले. शेवटच्या षटकात बेथेलने 35 धावांचे योगदान दिले. ट्रॅव्हिस हेड आणि लॅबुशेन यांनीही गोलंदाजीत कमाल केली. हेडने 4.4 षटकात 34 धावा देत 2 बळी घेतले. लॅबुशेनने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत 3 बळी घेतले. तर ॲडम झाम्पालाही तीन विकेट्स घेण्यात यश मिळाले.

हेही वाचा-

ind vs ban; दुसऱ्या दिवशी संघाचा प्लॅन काय? हसन महमूद म्हणाला, ‘जर आम्ही त्यांना 400 च्या आधी…’
IND VS BAN; बांग्लादेशकडून नियमांचे उल्लंघन, आयसीसीकडून मोठी कारवाईची शक्यता
10 चौकार, 3 षटकार… दुलीप ट्रॉफीत संजू सॅमसनचा रुद्रावतार; केली इतक्या धावांची खेळी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---