इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात पहिला टी२० सामना (७ जुलै) साउथम्पटनच्या रोज बाउल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ५० धावांनी यजमान संघाला पराभूत करत चाहत्यांना धीर दिला आहे. या सामन्यात अनेक वेगवेगळ्या बाबी पाहायला मिळाल्या. त्यातील पहिली बाब म्हणजे अर्शदीप सिंग याचे रखडलेले आंतरराष्ट्रीय पदार्पण, दुसरी बाब अशी की हार्दिक पंड्या याची अष्टपैलू खेळी. तिसरी बाब म्हणजे या सामन्यात घडलेला एक योगायोग. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि या सामन्यात पंचांची कामगिरी बजावणारे ऍलेक्स वॉर्फ (Alex Wharf) यांच्यात घडलेला हा योगायोग आहे.
झाले असे की, सप्टेंबर २००४मध्ये जेव्हा कार्तिकने लॉर्ड्सवर झालेल्या वनडे सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हा विरोधी संघ अर्थातच इंग्लंडच्या चमूत ऍलेक्स वॉर्फ नावाचा खेळाडू त्याच्या कारकिर्दीतला तिसरा वनडे खेळत होता. तोच खेळाडू नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत पहिल्या टी२० सामन्यात पंचाच्या भूमिकेत होता. यामुळे खेळपट्टीवर कार्तिक खेळाडू तर वॉर्फ हा पंच होता.
लॉर्ड्सवर झालेल्या त्या सामन्यात कार्तिकने एक धाव करतच बाद झाला. मात्र त्याने उत्तम यष्टीरक्षण केले होते. या सामन्यात त्याने वॉर्फचा झेलही घेतला होता. तर मायकल वॉला स्टम्पिंग बाद आणि पॉल कॉलिंगवूडला मोहम्मद कैफ (Mohammed Kaif) याच्या मदतीने धावबाद केले होते. या सामन्यात वॉर्फने ९ धावा केल्या होत्या. भारत हा सामना सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या नेतृत्वाखाली खेळत होता. या सामन्यात भारताने इंग्लंडवर २३ धावांनी विजय मिळवला होता.
इंग्लंड विरुद्धच्या टी२० सामन्यात कार्तिक चमकला नाही. त्याने ७ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने ११ धावा केल्या. या सामन्यात भारताने ८ विकेट्स गमावत १९८ धावा केल्या होत्या. त्याच्या बदल्यात इंग्लंडचा संघ १४८ धावांवरच गारद झाला. यामुळे भारताने तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत ही मालिका नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
टी २० मालिकेतील दुसरा सामना ९ जुलैला तर तिसरा सामना १० जुलैला खेळला जाणार आहे. या सामन्यांनाही वॉर्फ हेच पंच असण्याची शक्यता आहे. कार्तिकने घेतलेल्या त्या झेलचा वॉर्फ कसा बदला घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वयाच्या २७व्या वर्षी ४८ लाख गुंतवणूक करुन स्मिथ बनला ६० कोटींचा मालक, पाहा नक्की काय लढवली शक्कल
ईदच्या आदल्या दिवशीच चोराने लावला कामरान अकमलला ‘चुना’, चोरलं ९० हजारांच बकरं
हार्दिक-अर्शदीपच्या खेळीने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू खूष! आनंदाच्या भरात बोलून गेला..