इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात लॉर्ड्स येथे दुसरा वनडे सामना (१४ जुलै) सुरू आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाची दाणादाण उडवली आहे. मागील सामन्यात जसप्रीत बुमराह इंग्लंडचा कर्दनकाळ ठरला होता. आज त्याची जागा युझवेंद्र चहलने घेतली आहे. त्याने इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत त्यांचा धावा करण्याचा वेग कमी केला आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने जॉनी बेयरस्टो, जो रुट (Joe Root) आणि बेन स्टोक्स यांना बाद केले आहे. तत्पूर्वी सामन्याचे पहिलेच षटक टाकायला आलेल्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने ८.५व्या षटकातच जेसन रॉयला बाद केले आहे. रॉयने २३ धावा केल्या आहेत. नंतर जे काही यजमान संघाची घसरण सुरू राहिली ती काही काळ थांबेल असे वाटत असतानाच चहलने १५व्या षटकात इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने तुफानी फलंदाज जॉनी बेयरस्टो याला त्रिफळाचीत केले आहे. त्याने ३८ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ३८ धावा केल्या. त्यानंतर त्याने रुटला देखील पायचीत केले आहे.
A CRUCIAL WICKET FOR INDIA!
Bairstow misses the ball and is clean-bowled ❌ pic.twitter.com/AasL496qfY
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 14, 2022
रुट-बेयरस्टो यांच्या धक्क्यांनतर यजमान संघ सावरत असतानाच मोहम्मद शमीने जोस बटलर (Jos Buttler) याला त्रिफळाचीत केले. रिव्हर्स स्वीप मारण्यात पटाईत असणारा बेन स्टोक्स (Ben Stokes) पण लवकरच बाद झाला आहे. त्याला चहलने पायचीत केले. त्याने २३ चेंडूत ३ चौकार मारत २१ धावा केल्या. यावरून रोहित शर्मा (Rohit Sharma) याने घेतलेल्या निर्णयाचा संघाला फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
JOE ROOT LBW! ❌
The ball hits Joe Root's pads and he's given OUT lbw, England lose their review. pic.twitter.com/L8BnP9HkFI
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 14, 2022
या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) हा अंतिम अकरामध्ये परतला असून श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिकने धोकादायक फलंदाज लियाम लिविंगस्टोन यालाही बाद केले आहे. त्याने ३३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत ३३ धावा केल्या आहेत.
सामना सुरू असून इंग्लंडने ४०.१ षटकात ६ विकेट्स गमावत २०७ धावा केल्या आहेत. खेळपट्टीवर मोईन अली (४५) आणि डेविड विले (२५) उपस्थित आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबा बनलो रे! दुसऱ्यांदा सीएसकेचा रॉबिन उथप्पा बनला वडील, नवजात मुलीचं नावही केलंय रिव्हील
विराटच्या फॉर्मबाबत दादांनी केले मोठे वक्तव्य; संघातून वगळले गेल्याचे कारणही केले स्पष्ट
बीसीसीआयने पुन्हा तोडली ‘या’ फिरकीपटूंची जोडी; एकाला संघात घेताच दुसऱ्याला ‘विनाकारण’ बसवलं