इंग्लंड आणि भारत (ENGvsIND) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी (१४ जुलै) लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना दुपारी एक वाजता सुरू होईल, तर भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. सामन्यादरम्यान वातावरण साफ असेल आणि पावसाचीही कसलीच शक्यता नाहीये.
लॉर्ड्स स्टेडियमची पीच रिपोर्ट –
लॉर्ड्स स्टेडियमची (Lords Stadium) खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही सारखीच फायदेशीर ठरत आली आहे. एकदिवसीय मालिकेत याठिकाणी पहिल्या डावात सरासरी २३८ धावा बनतात, तर दुसऱ्या डावातील सरासरी २१३ धावांची आहे. लॉर्ड्सवर आतापर्यंत एकूण ७० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी आणि गोलंदाजी केली, तरी दोन्ही संघांसाठी परिस्थिती जवळपास सारखी असल्यामुळे सामना रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे. भारताने या मैदानात यापूर्वी ८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी ४ सामन्यांमध्ये विजय, तर ३ सामन्यांमध्ये संघाला पराभव स्वीकारावा लागला. राहिलेला एक सामना निकाली निघाला नव्हता.
हवामान अंदाज –
गुरुवारी लंडनमध्ये वातावरण स्वच्छ असेल, त्यामुळे सामना सुरू असताना पाऊस येण्याची कसलीही शक्यता नाहीये. सामन्यादरम्यान काही तास कडक सूर्यप्रकाश पडेल, असा हवामान अंदाज सांगितला गेला आहे. दिवसा तापमान २४ डिग्री सेल्सियस, तर रात्री हेच तापमान २१ डिग्री असण्याची शक्यता आहे. हवेत काही प्रमाणात आद्रता असण्याची शक्यताही आहे. १४ किमी ताशी गतीने हवा वाहत असेल. भारतीय संघाने यापूर्वी २०१८ साली लॉर्ड्सवर शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, जो इंग्लंडने ८६ धावांनी जिंकलेला.
उभय संघातील एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ ०-१ अशा आघाडीवर आहे. पहिला सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केले आणि इंग्लंडला अवघ्या ११० धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तारात भारतासाठी सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी अनुक्रमे ७६ आणि ३१ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. भारताने या सामन्यात एकही विकेट गमावली नाही. ६ विकेट्स घेण्यासाठी जसप्रीत बुमराहला सामनावीर निवडले गेले. मालिकेतील दुसरा सामना जिंकल्यानंतर भारत मालिका नावावर करेल, तर इंग्लंडसाठी मात्र हा सामना ‘आर किंवा पार’ असा असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ENGvsIND: इंग्लंडला हरवणे सोपे नाही, वनडेतील कामगिरी पाहुन तुम्हीही असेच म्हणाल