इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने झटपट दोन विकेट्स घेत भारताला उत्तम सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने विरोधी संघाच्या महत्वाच्या खेळाडूंना बाद करत त्यांचा धावा करण्याचा वेग काहीसा संथ केला आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ३७व्या षटकात गोलंदाजीसाठी आला असता त्याने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर लियाम लिविंगस्टोनने मोठा शॉट मारला. मात्र सीमारेषेवर उभे असलेल्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने तो झेल उत्तमरित्या घेतला. जडेजा हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहेच हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने हवेत शॉट खेळला असता डीप स्क्वेयर लेगवर उभा असलेल्या जडेजाने मिड-विकेट पर्यंत धावत येत हा झेल घेतला आहे. हा झेल अवघड वाटत असला तरी जडेजाने तो चांगला घेतला आहे.
लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने ३१ चेंडूत २७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. तर जोस बटलर (Jos Buttler) याने ८० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या आहेत.
https://twitter.com/englandcricket/status/1548655697579032582?s=20&t=CBV3-5P0SqPmpLESBhiohw
या निर्णायक सामन्यात भारतीय संघाने दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली. त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो व जो रूट या दोघांनाही खातेही न खोलता तंबूत पाठवले.
या सामन्यात हार्दिकने ७ षटके टाकताना २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यातील ३ षटके निर्धाव टाकली आहेत. सध्या ही त्याची वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. हार्दिकने २०१६मध्ये पदार्पणाच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध ३१ धावा देत ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
इंग्लडने ४५.५ षटकात सर्वबाद २५९ धावा केल्या. बटरलने केलेली खेळी इंग्लंडकडून सर्वोच्च ठरली आहे. तर, रॉय ४१, मोईन अली ३४ धावा आणि क्रेग ओव्हरटनने ३२ धावा केल्या आहेत. भारताची गोलंदाजी प्रभावशाली ठरली असून हार्दिक व्यतिरिक्त सिराजने २, युझवेंद्र चहलने ३, जडेजाने १ विकेट्स घेतल्या आहेत.
तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत असल्याने दोघांसाठीही हा सामना मालिका विजयाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाचे कौतुक करताना समालोचकाने वापरले ‘गौरवास्पद’ शब्द; म्हणाले “तो”…
भारत-पाकिस्तान ३१ जुलैला येणार आमने-सामने, वाचा कधी आणि कुठे रंगणार सामना
बाबरच्या शतकामुळे पाकिस्तानची समाधानकारक कामगिरी, नावावार केला खास विक्रम





