इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND)याच्यांत झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने बाजी मारली आहे. ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅनचेस्टर येथे झालेल्या या मालिका निर्णायक सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. यामध्ये महत्वाची भुमिका यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांनी पार पाडली आहे. त्यातच पंतने त्याच्या वनडे कारकीर्दीतील पहिले शतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) याने या सामन्यात नाबाद १२५ धावा केल्या आहेत. यामुळे त्याने परदेशी भुमीवर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटीमध्ये त्याने नाबाद १५९ धावांची खेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०१९मध्ये केली होती. तर २०१९मध्ये गयाना येथे वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद ६५ धावा केल्या आहेत.
रिषभने आपल्या २७ व्या सामन्यात आपले पहिले वनडे शतक पूर्ण केले. या शतकासाठी त्याने १०५ चेंडू घेतले. इंग्लंडमध्ये शतक ठोकणारा तो केवळ तिसरा भारतीय यष्टीरक्षक बनला. यापूर्वी राहुल द्रविड व के एल राहुल यांनी अशी कामगिरी केली होती. मँचेस्टर येथे वनडेत शतक करणारा तो रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय आहे.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. यावेळी यजमान संघ ४५.५ षटकातच गारद झाला. त्यांनी सर्वबाद २५९ धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने ६० धावांची खेळी केल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली. नाहीतर पंड्या आणि मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत त्यांच्या धावाची गती संथ केली होती.
रिषभने या सामन्यात भारताचा डाव ७२ धावांवर ४ विकेट्स असा असताना फलंदाजीला येत तुफानी खेळी केली आहे. त्याने १५९ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकार मारत ११०.६१च्या स्ट्राईक रेटने नाबाद १२५ धावा केल्या. यावेळी त्याला पंड्याची योग्य साथ लाभली. पंड्याने ५५ चेंडूत १० चौकारच्या मदतीने ७१ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११५ चेडूंत १३३ धावा केल्या.
परदेशी भुमीवर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारे भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज
कसोटी क्रिकेट – रिषभ पंत (नाबाद१५९)
वनडे क्रिकेट – रिषभ पंत (नाबाद १२५)
टी२० क्रिकेट – रिषभ पंत (नाबाद ६५)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी जिम्बाब्वे करणारा ऑस्ट्रेलिया दौरा, क्वालिफायर सामन्यात नेदरलँड पराभूत
लहान वयातच अनेकांसाठी आदर्श ठरलेली ‘सांगलीकर’ स्मृती मंधाना
भारताशी दोन हात करण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ सज्ज, वाचा कोणाकोणाला मिळाली संधी?