इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ७६ धावांच्या मोठ्या फरकाने पराजित झाला आहे. यानंतर भारतीय संघ चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे. कर्णधार विराट कोहली पासून ते यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतपर्यंत सर्वांवर टीका होत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताच कर्णधार कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि पंत हे खराब फार्ममध्ये आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यातील या मोठ्या पराजयानंतर काही खेळाडूंच्या स्थानावर टांगती तलवार आहे. अशात कर्णधार कोहलीने पंतविषयी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
मालिकेतील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर कर्णधार कोहलीने म्हटले, खराब प्रदर्शनानंतरही संघ व्यवस्थापन इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील राहिलेल्या सामन्यांत फलंदाजीसाठी पंतला संधी देणार आहे.
कोहली म्हणाला, “एका पराजयाने पंतचे आकलन केले जाऊ शकत नाही. कारण आम्ही संघाच्या रूपात अपयशी होत नाहीये. चेतेश्वर पुजाराविषयीही लोकं कालपर्यंत हेच बोलत होते. मात्र, जेव्हा त्याने ९१ धावांचा डाव खेळला तेव्हापासून सर्वकाही ठीक झाले. त्यामुळेच आम्ही पंतला त्याचा खेळ खेळण्यासाठी पूर्ण संधी देणार आहोत. आमची इच्छा आहे की, त्याने परिस्थिती समजून घ्यावी आणि जबाबदारी घ्यावी, जसे की फलंदाजी क्रमात प्रत्येकाकडून अपेक्षा केली जाते.”
कोहली पुढे म्हणाला, “तुम्ही नेहमी लोकांना आकड्यांच्या आधारे ठरवू शकत नाही की तो यशस्वी होत आहे की अयशस्वी. तुम्ही अशाप्रकारे संघ नाही बनवत. बाहेर जे काही बोलले जात आहे, आम्ही त्याची पर्वा करत नाही. आम्हाला माहित आहे की, तो चांगला खेळत होता, ही फक्त वेळेची गोष्ट आहे की तो पुन्हा कधी लयीत येईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोण रूट? त्याला मुळासकट उपटून फेकू’; लीड्स कसोटीनंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल
खराब फॉर्मातील भारतीय खेळाडूंची चौथ्या कसोटीतून हकालपट्टी; माजी क्रिकेटर म्हणाले, ‘बदल आवश्यक’
इंग्लंडपुढे रिषभ ठरला नामोहरम, कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ लाजिरवाणी कामगिरी






