---Advertisement---

खराब फॉर्मातील भारतीय खेळाडूंची चौथ्या कसोटीतून हकालपट्टी; माजी क्रिकेटर म्हणाले, ‘बदल आवश्यक’

On: रविवार, ऑगस्ट 29, 2021 11:27 AM
Team-India
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली. लाॅर्ड्सवरील भारताने मिळवलेल्या दमदार विययानंतर चाहत्यांना संघाकडून तिसऱ्या कसोटीतही अशाच प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, चाहत्यांच्या या अपेक्षेवर तिसऱ्या सामन्यातील पराजयामुळे पाणी फेरले गेले. भारतीय संघ सामन्यातील पहिल्या डावात केवळ ७८ धावांवर सर्वबाद झाला आणि दुसऱ्या डावात संघ केवळ २७८ धावा बनवू शकला. त्यामुळे त्यांना १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले व कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे.

भारतीय संघाच्या पराजयानंतर भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांना संघाच्या प्लेइंग इलेव्हनच्या काॅम्बिनेशनमध्ये काहीतरी कमतरता दिसत आहे. त्यांनी भारतीय संघाला सल्ला दिला आहे की, त्यांनी ओव्हल कसोटी सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याविषयी विचार करावा.

गावरकरने सोनी नेटवर्कवर समालोचनादरम्यान बोलताना म्हटले, “भारतीय संघाला आता त्यांच्या प्लेइंग इलेव्हनच्या व्यवस्थापनावर विचार करण्याची गरज आहे. रिषभ पंतने ३ कसोटी सामन्यांत मोठ्या धावा केल्या नाहीत. म्हणून आता चौथ्या कसोटी सामन्यात एका अतिरिक्त फलंदाजास उतरवण्याविषयी विचार करावा लागेल. भारतीय संघ जर ४ गोलंदाज आणि ७ फलंदाजांसह मैदानात उतरला तर ही रणनिती योग्य ठरेल. कारण सध्या भारतीय संघाची कमजोरी त्याची फलंदाजीच वाटत आहे.”

विराटनेही दिले संघात बदल करण्याचे संकेत
लीड्सच्या मैदानावरील पराजयानंतर भारतीय संघाच्या कर्णधार विराट कोहलीनेही भारतीय संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. तो म्हणाला, “पुढच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ रोटेशनचा विचार करेल. कारण प्रत्येक खेळाडूला ४ कसोटी सामने खेळवले जाऊ शकत नाहीत.”

भारतीय संघ सामन्याच्या चौथ्या दिवशी कोसळला
लीड्सवरच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ एकदा पुन्हा इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे कोसळलेला दिसला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत भरताने २ विकेट गमावत २१५ धावा केल्या होत्या. चाहत्यांना पुजारा आणि विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, ऑली राॅबिनसनच्या गोलंदाजीपुढे भारतीय खेळाडू टिकू शकले नाहीत. राॅबिनसने प्रथम पुजाराला तंबूत पाठवले आणि त्यानंतर कर्णधार कोहलीलाही त्याने माघारी धाडले. पुढे भारतीय संघाने पाहता-पाहता त्यांचे ८ विकेट्स केवळ ६३ धावांमध्ये गमावले. सामन्यात ७ विकेट्स मिळवणाऱ्या ऑली राॅबिनसनला सामनावीर निवडले गेले.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडपुढे रिषभ ठरला नामोहरम, कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ लाजिरवाणी कामगिरी

बॅकफूटवर असलेल्या पंजाब किंग्जच्या अपेक्षा उंचावल्या, लीड्स कसोटीचा ‘नायक’ आयपीएलमध्ये खेळणार

ऑली रॉबिन्सनचा कहर! भारताच्या ५ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---