भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी जिंकला. मालिकेतील चौथा सामना दोन सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांवर बाद केले होते. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडने सामन्यात वर्चस्व निर्माण केले होते. अशात भारतीय संघाचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरने सहाव्या क्रमांकावरील फलंदाजासाठी मुंबईचा सुर्यकूमार यादवला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याचा सल्ला दिला आहे. कर्णधार विराट कोहली मध्यक्रमाच्या सततच्या अपयशानंतरही पाच गोलंदाजांना खेळवण्याच्या समर्थनात आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि निवडकर्ता दिलीप वेंगसरकर म्हणाला, “मला वाटते आपल्याला आपल्या फलंदाजी लाइन-अपला मजबूत कराण्याची गरज आहे. हनुमा विहारी ऐवजी सुर्यकुमार यादवला सामील केल्यावर हे होऊ शकतो. आपण एका गोलंदाजाला बाहेर करून सहाव्या फलंदाजासह उतरायला हवे.” याआधी भारताचा महान खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावसकरनेही ६ फलंदाजांसह सामना खेळण्याला सहमती दिली होती.
वेंगसरकरच्या मते सुर्यकुमारमध्ये प्रतिभा आणि उत्फुर्ती आहे, जे त्याला कसोटी सामन्यात भारतीय संघात स्थान निर्माण करू शकते. त्याने पुढे बोलताना म्हटले, “कौशल्याच्या बाबतीत सुर्यकुमार भारतीय संघासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि तो मागच्या काही काळापासून भारतीय संघासोबत आहे. त्यामुळे उशीर होण्याच्या आधी त्याला संघात सामिल केले गेले पाहिजे.”
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत झाला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर सामना १५१ धावांनी जिंकला होता. तसेच मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे टिकू शकले नाहीत आणि संघाला सामन्यात पराजयाला सामोरे जावे लागले.
अशात येता चौथा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवला संधी देण्याचा विचार करेल की नाही, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या भेदकतेपुढे भारताची भंबेरी! विराटच्या ‘या’ निर्णयांनी हुकवली सलग दुसऱ्या विजयाची संधी
लीड्स कसोटीनंतर इंग्लंडची सलग दुसऱ्या विजयाची तयारी, ‘या’ धुरंधराला देणार संधी!