इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात पाचवा कसोटी सामना सुरू आहे. एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने शतक केले आहे. त्याचे हे कसोटीतील तिसरे आणि परदेशी मैदानावरील पहिले शतक ठरले आहे. त्याच्या या शतकी खेळीवर विरोधी संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जडेजाने १९४ चेंडूत १०४ धावा केल्या आहेत.
“तो आधी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याने त्याला अधिक फलंदाजी करण्याची संधी भेटत नव्हती. आता तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने कसलेल्या फलंदाजांसारखी खेळी केली आहे. यामुळे त्याने आमच्यासाठी अडचणी निर्माण केल्या आहेत,” असे मत अँडरसनने व्यक्त केले आहे.
अँडरसनच्या या मताला जडेजाने उत्तर देत म्हणाले, “आपण जेव्हा धावा करत असतो तेव्हा तो स्वत: ला फलंदाज समजत असतो. मात्र मी फलंदाजीला येतो तेव्हा मला समोरच्या फलंदाजाला वेळ देत मोठी भागीदारी करण्याचा माझा प्रयत्न असतो. बरं झालं २०१४ नंतर अँडरसनला समजले आहे.”
अँडरसन आणि जडेजा यांच्यात २०१४ मध्ये थोडी शाब्दिक देवाणघेवाण झाली होती. या घटनेची माहिती त्यावेळेचे संघव्यवस्थापक सुनील देव यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना दिली होती. ट्रेंटब्रीज येथे झालेल्या कसोटी सामन्यात अँडरसनने जडेजाला धक्का दिला होता. त्यावेळी संपुर्ण संघाने अंपायरकडे त्याची तक्रार केली होती. सामन्यात कोणताही खेळाडू कोणाला धक्का देऊ शकत नाही. अंपारयरनेही याची दखल घेतली असल्याने अँडरसनला पुढे शिक्षा केली होती. त्याच्यावर दोन ते तीन सामन्यांची बंदी करण्यात आली होती.
सध्या अँडरसन आणि जडेजा दोघेही या कसोटी सामन्यात समोरा-समोर आले आहेत. यावेळी अँडरसनने वाद निर्माण होईल अशी कोणतीही हालचाल केली नाही. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावा केल्या आहेत. त्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता ५ विकेट्स गमावत ८४ धावा केल्या आहेत. यामध्ये भारताकडे भक्कम आघाडी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रविंद्र जडेजाने काढला आयपीएलमधील राग? म्हणाला, ‘जे झाले, ते…’
एजबस्टन कसोटीमध्ये विराट बनला मेंटर, कॅप्टन बुमराहला ‘अशी’ केली मदत
अठरा वर्षे भारतीय संघाची सेवा केल्यानंतर कार्तिककडे नेतृत्त्वपद; भावूक ट्वीट करत म्हणाला, ‘गर्व आहे’