इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात यजमान संघाने भारतावर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंड संघाला ३७८ धावांचा पाठलाग करताना जो रुट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांनी नाबाद शतकी खेळी केली. यावेळी रुटने कसोटीतील त्याचे २८वे शतक केले. यावेळी त्याने पवेलियनकडे पाहत करंगळी वर करत सेलेब्रेशन केले. क्रिकेट चाहत्यांमध्ये हा प्रश्न पडलाच असेल की नेमके या सेलेब्रेशनचा अर्थ काय, तर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
या सामन्यात रुट आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी पिंकी फिंगर सेलेब्रेशन केले आहे. स्टोक्सने भारताच्या दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. भारताचा हा डाव २४५ धावांतच संपुष्टात आला होता. त्यावेळी त्याने विकेट्सचे आनंद पिंकी फिंगर वर करत केला होता. हे सेलेब्रेशन अमेरिकेचा महान रॉक एंड रोल गायक एल्विस प्रेस्ली याच्याशी प्रेरित आहे.
ऑस्टिन बटलर मुख्य भुमिकेत असलेला एल्विस हा हॉलीवूड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा एक बायोपिक चित्रपट असून त्यामध्ये एल्विस हा अनेकदा पिंकी फिंगरवर करताना दिसतो. सध्या हे अधिक व्हायरल झाले आहेे. हे सेलेब्रेशन इंग्लंडच्या तंबूतही पोहोचले आहे.
इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullam) याने हा चित्रपट पाहिला असून त्याने इंग्लंडच्या खेळाडूंना मैदानावर रॉकस्टारसारखी कामगिरी करा असे प्रोत्साहन दिले होते. यावरून रुट म्हणाला, ब्रेंडनने हा चित्रपट पाहिला असून तो पूर्ण आठवडाभर तेच करत होता. यासाठी त्याला मी एक भेट म्हणून ते सेलेब्रेशन केले होते.
Morning, Rockstars 🤘 pic.twitter.com/MAH9MBrz82
— England Cricket (@englandcricket) July 6, 2022
मला वाटले नव्हते मी कधी अशी कामगिरी करेल. त्या १० सेंकदामध्ये मलाही मी रॉकस्टार असल्याचा भास झाला. त्यासाठी पण मी पिंक फिंगर सेलेब्रेशन केले, असेही रुट पुढे म्हणाला आहे.
A batting God! 🙇
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 | @IGcom pic.twitter.com/eQJeCygG6r
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
या सामन्यानंतर झालेल्या बक्षिस वितरणामध्ये बेयरस्टो सामनावीर तर रुट मालिकावीर ठरला. रुटने ७३७ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यालाही मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या मालिकेत २३ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाचवी कसोटी गाजवणाऱ्या रिषभ पंतची मोठी झेप, पहिल्यांदाच कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान
टीम इंडियाच्या ११ खेळाडूंमध्ये बुमराह एकटाच ठरलाय उजवा, केलीय धम्माल कामगिरी