---Advertisement---

बिग ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा कसोटी सामना रद्द, कारण आहे मोठे

On: शुक्रवार, सप्टेंबर 10, 2021 1:27 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) कसोटी मालिकेतील शेवटचा, पाचवा कसोटी सामना सुरू होणार होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम, मँचेस्टर येथे हा सामना रंगणार होता. तत्पूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) हा सामना रद्द केला असल्याचे सांगितले आहे. भारतीय संघात झालेल्या कोरोनाच्या शिरकावामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ईसीबीने सांगितले आहे. बीसीसीआय आणि ईसीबीमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांचे सहकारी प्रशिक्षक आर श्रीधर आणि भरत अरुण यांनाही कोरोनाची लागण झाल्याने विगलीकरणात ठेवण्यात आले होते. भारतीय संघाने हा सामना प्रशिक्षकांच्या सहकार्याविना खेळला होता.

त्यानंतर पाचव्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधीच संघातील अजून एक सदस्य कोरोना पॉजिटिव्ह आढळला. त्यामुळे ईसीबीने खबरदारीचा उपाय म्हणून पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रद्द केला आहे.

पाहुणा भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर होता. दुसरा आणि चौथा कसोटी सामना जिंकत त्यांनी ही आघाडी घेतली होती. अशात पाचवा आणि अंतिम कसोटी सामना जिंकत किंवा अनिर्णीत राखत मालिकाही खिशात घालण्याची त्यांच्याकडे संधी होती. परंतु हा सामना रद्द झाल्याने मालिकेचा विजेता कोण असेल? हा निर्णय गुलदस्त्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, राशिदचा कर्णधारपदावरुन राजीनामा, नवा कर्णधार कोण?

टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, मोहम्मद नबीकडे कर्णधारपद; पाहा संपूर्ण टीम

टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, ६ वर्षांनंतर धाकड गोलंदाजाचे पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---