भारत आणि इंग्लंड (India & England)यांच्यात झालेल्या पुर्वनियोजित पाचव्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने (आंंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) कसोटीची क्रमावरी जाहीर केली आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघांच्या काही खेळाडूंनी विशेष कामगिरी केली आहे. यामध्ये भारताचा रिषभ पंत (Rishabh Pant) आणि इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांचा समावेश आहे. या दोघांनीही या सामन्यात शतकी खेळी करत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीच्या खेळाडूंच्या पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे.
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज पंतने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १११ चेंडूत १४६ धावा आणि दुसऱ्या डावात ५७ धावा केल्या. त्याने मागील सहा कसोटी डावांमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. याच कामगिरीमुळे त्याला पाच स्थानांचा फायदा त्याला झाला असून तो आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आला आहे. आतापर्यत त्याची ही कसोटीतील सर्वोत्कृष्ठ क्रमवारी ठरली आहे.
भारताविरुद्ध केलेली नाबाद ११४ धावांच्या खेळीने बेयरस्टो फलंदाजांच्या क्रमवारीत ११ स्थानांनी पुढे जात दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ३२वर्षाचा हा खेळाडू सध्या जोरदार लयीत असून त्याने मागील तीन कसोटी सामन्यांमध्ये चार शतके झळकावली आहेत. त्यामध्ये एजबस्टन कसोटीमध्ये केलेल्या दोन शतकांचा समावेश आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धही दोन शतके केली आहेत.
या क्रमवारीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला मात्र नुकसान झाले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ११ आणि २० धावा केल्या होत्या. सहा वर्षानंतर तो पहिल्यांदाच पहिल्या दहामधून बाहेर पडला आहे. त्याला आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांचे नुकसान झाले असून तो १३व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट (Joe Root) याने अव्वल क्रमांकावर आपला ताबा कायम ठेवला आहे. त्याने भारताविरुद्ध नाबाद १४२ धावांची खेळी केल्याने त्याचे ९२३ गुण झाले आहेत. त्याचबरोबर आयसीसी कसोटी ऐतिहासिक फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या २० खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे.
जेम्स अँडरसन (James Anderson) यानेही एका स्थानाने उडी घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने भारताविरुद्ध सहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे मागील तीन सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या ११ खेळाडूंमध्ये बुमराह एकटाच ठरलाय उजवा, केलीय धम्माल कामगिरी
भारतीय दिग्गजांनी गायले इंग्लंडचे कौतुक, टीम इंडियाला म्हटले ‘या’ चुका सुधारा
विराटला बार्मी आर्मीनेही केलं ट्रोल; लिहिले कोहलीने १८ महिन्यात जेवढ्या धावा नाही केल्या त्यापेक्षा…