इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात होणार पहिला टी२० सामना गुरूवारी (७ जुलै) खेळला जाणार आहे. हा सामना द रोज बाउल, साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचे कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit Sharma) भुषविणार असल्याचे निश्चित आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कसून सराव केला आहे. त्याचे फोटो बीसीसीआयने (भारतीय नियामक मंडळ) सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
भारताचा आता कर्णधार आणि जर्सी बदलली असून भारताचा खेळही बदलणार असल्याची अपेक्षा चाहते करत आहेत. हर्षल पटेल, हार्दिक पंड्या आणि इशान किशन हे मैदानावर सराव करताना दिसले.
भारताची या दौऱ्यात निराशा झाली आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिघम येथे मालिका निर्णायक पाचवा कसोटी सामना झाला. या सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. या सामन्यात भारताचे नेतृत्व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने केले होते. रोहित कोरोनामुळे या सामन्यात खेळला नव्हता.
Gearing up for the T20Is 💪#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/YHqaaQ0G0R
— BCCI (@BCCI) July 6, 2022
कसोटी सामना झाल्यावर भारत आणि इंग्लंड यांच्यात मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. त्यात तीन सामन्यांंची टी२० मालिका आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यासाठी रोहितचे पुन्हा एकदा भारताच्या संघात आगमन झाले आहे. भारताची कसोटी सामन्यात रिषभ पंत (Rishabh Pant), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), बुमराह हे खेळाडू वगळता बाकी खेळाडूंनी निराशा केली आहे.
या टी२० मालिकेसाठी संघात काही नवे चेहरे दिसणार आहे. यातील हार्दिक पंड्या, इशान, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार यांनी दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या टी२० सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी इंग्लंड विरुद्धही अशीचे खेळी करण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना वगळले आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा टी२० सामना ९ जुलै आणि तिसरा टी२० सामना १० जुलैला खेळणार आहेत. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला वनडे सामना १२ जुलैला खेळला जाणार आहे.
कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले असल्याने चाहचे खूपच भडकले आहेत. यामुळे संघ मर्यादित षटकांच्या सामन्यात कशी प्रगती करेल याकडे लक्ष असणार आहे.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी भारताचा अंतिम अकराचा संघ खालील खेळाडूंमधून निवडला जाईल,
रोहित शर्मा (कर्णधार), रुतूराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, इशान किशन, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बर्थ डे बॉय एमएस धोनी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल; फोटो व्हायरल
वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन
वयाच्या २४व्या वर्षी कोट्यवधीत पैसे कमावतोय ‘हा’ भारतीय क्रिकेटर, नेटवर्थ ऐकून उडेल झोप