भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसला कसोटी सामना २५ ऑगस्टपासून लीड्स मैदानात खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झालेली दिसत आहे. मात्र, भारतीय संघाची अवस्था जरी खराब झाली असली तरी भारतीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यादरम्यान त्याच्या नावावर एक नवीन विक्रम नोंदवला आहे.
शमीने सेना देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) १०० विकेट मिळवल्या आहेत. हा पराक्रम करणारा शमी भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारतासाठी कपिल देव, अनिल कुंबळे, जहील खान, आणि इशांत शर्मा या चार गोलंदाजांनी हा कारनामा केला आहे.
भारतासाठी हा करनामा सर्वात आधी कपिल देवने केला होता. सेना देशांत भारतीय संघासाठी सर्वात जास्त विकेट अनिल कुंबळेने घेतले आहेत. कुंबळेने भारतासाठी ३५ कसोटी सामन्यांत १४१ विकेट घेतल्या आहेत. इशांतने १३० विकेट या सेना देशांमध्ये मिळवल्या आहेत. जहीर खानने ११९ विकेट आणि कपिल देवने ११७ विकेट त्याच्या कसोटी कारकिर्दीत मिळवल्या आहेत.
लीड्सवरच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावादरम्यान मोहम्मद शमीने रॉरी बर्न्सला त्रिफळाचीत करत त्याने घेतलेल्या सेना देशांतील १०० विकेट पूर्ण केल्या आहेत. त्याने हा कारनामा केवळ २९ कसोटी सामन्यात केला आहे. शमीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ५४ सामने खेळले आहेत.
सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाची वाईट अवस्था
लीड्सवरील कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या अडचणीत सापडला आहे. इंग्लंडने भारतीय संघाला सामन्याच्या पहिल्याच दिवशी ७८ धावांवर सर्वबाद केले आहे. यापूर्वी भारतीय संघने मागच्या ५६ वर्षात लीड्सवरचा एकही सामना हारलेला नाही. भारतीय संघाने त्यांचा या मैदानावरील अखेरचा कसोटी सामना २००२ मध्ये खेळला होता. त्यानंतर आता २०२१ मध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ पराजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने या तिसऱ्या कसोटी सामन्यात संघासाठी १२१ धावांची महत्वाची खेळी केली आहे. भारताविरुद्ध जो रूटचे हे आतापर्यंतचे ८ वे शतक आहे. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाखेर ४२३ धावा केल्या असून ३४५ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक
सर डॉन ब्रॅडमन यांच्या फलंदाजीचा ७१ वर्षे जूना रंगीत व्हिडिओ पाहिलाय का?
‘हा कर्णधाराचा निर्णय आहे’, इशांतच्या फिटनेसविषयी शमीने दिली महत्त्वपूर्ण माहिती