इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने १० विकेट्सने मोठा विजय मिळवला. या सामन्यात फलंदाज विराट कोहली अंतिम अकरामध्ये नव्हता. यावरून आश्चर्य व्यक्त केले जात होत. मात्र तो या सामन्यात दुखापतीमुळे मुकला होता, असे कारण पुढे आले आहे. आता तो लॉर्ड्स आणि मॅनचेस्टर येथे होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळणार की नाही याबाबत सांशकता आहे.
भारताच्या महत्वाच्या खेळाडूपैकी एक विराट कोहली मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने मागील चार डावांमध्ये ११, २०, १ आणि ११ अशा धावा केल्या आहेत. त्यातच त्याने २०१९पासून एकही आंतरराष्ट्रीय शतकी खेळी केली नाही. यामुळे चिडलेल्या माजी खेळाडूंनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर टिंकाचा भडिमार केला आहे.
यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यासाठीभारताच्या सर्वोत्कृष्ठ अंतिम अकरा खेळाडूंची शोधमोहिम सुरू आहे. म्हणूनच भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी मागील काही टी२० मालिकांमध्ये युवा खेळाडूंना अधिक संधी दिली आहे. त्या मालिकांमध्ये काही खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत संघात आपली जागा पक्की केली आहे. त्यामुळे काही वरिष्ठ खेळाडूंवर संघाच्या बाहेर होण्याचा धोका संभवतो आहे.
कोहली आणि काही युवा खेळाडूंची कामगिरी पाहता, कोहलीला संघात ठेवायचे की नाही यावरून चर्चा सुरू आहेत. त्यातच भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा (Ashish Nehra) याने कोहलीची पाठराखण केली आहे. त्याने कोहलीने त्या ‘आवजांकडे दुर्लंक्ष करावे’ असा सल्ला दिला आहे. कोहलीने एक महिना ब्रेक घेतला तर चांगली कमगिरी करण्यात मदत होईल, असेही मत त्याने मांडले आहे.
नेहरा म्हणाला, “जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपल्या खेळावरच लक्ष केंद्रित करायला हवे. यावेळी ड्रेसिंग रुमच्या बाहेर जे लोक बोलत आहेत त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे अधिक उत्तम असणार आहे.”
“वयाच्या ३३व्या वर्षीही त्याचा फिटनेस चांगला असून त्यात कोणतीही शंका नाही. सगळ्यांनाच त्याने लवकर लयीत यावे अशी अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजच्या मालिकेनंतर आपल्याला वेगळा विराट दिसण्याची शक्यता आहे. त्याने जर एक महिना विश्राती केली तर ती उपयोगी ठरणार आहे,” असेही नेहराने पुढे म्हटले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा वनडे सामना १४ जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विराटची अंतिम अकरामध्ये निवड होणार की नाही हे निश्चित नाही. मात्र त्याला संधी देण्यात हवी अशी मते काहींनी व्यक्त केली आहेत.
विराटने २६० वनडे सामन्यात ५८.०७च्या सरासरीने १२३११ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ४३ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका शतकासह सूर्यकुमारने बदलले टी२० रँकिंगचे गणित, रोहित-इशानलाही मागे सोडत ठरला ‘दादा’
लॉर्ड्सवर भारत-इंग्लंडमध्ये कोण ठरलंय वरचढ, जाणून घ्या दोन्ही संघांचा या मैदानावरील विक्रम
बुमराहसोबतच्या जुगलबंदीचे शमीने उलगडले रहस्य, आगामी सामन्यांसाठीची योजनाही केली स्पष्ट