इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यामध्ये झालेल्या दोन्ही सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला खेळपट्टीवर चांगलीच स्विंग प्राप्त झाली आहे. त्याने साउथम्पटन आणि एजबस्टन येथे झालेल्या सामन्यात जोस बटलर (Jos Buttler) याला बाद केले होते. या सामन्यांमध्ये चेंडूला स्विंग कशी प्राप्त झाली यामागचे रहस्य खुद्द भुवनेश्वरने उलगडले आहे.
भारताला मालिकेत २-० अशी आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या भुवनेश्वरने म्हटले, “मला खरच माहीत नाही की चेंडू का स्विंग होत आहे ते.” तो सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता.
“मी इंग्लंडमध्ये मागे अनेक वेळा आलो आहे. त्यावेळी सामन्यांमध्ये चेंडूला आजच्यासारखी स्विंग कधीच मिळाली नाही. पांढरा चेंडू इतका स्विंग होत होता याचे मलाच आश्चर्य वाटले आहे. टी२०च्या क्रिकेटमध्ये चेंडू अधिक वेळ स्विंग झाला हे विशेष आहे. जेव्हा चेंडू स्विंग होतो तेव्हा गोलंदाजांला त्याचे अधिक फायदे होतात,” असे भुवनेश्वरने म्हटले आहे.
भुवनेश्वर पुढे म्हणाला, “मात्र चेंडू इतका का स्विंग होतोय हे मलाही ठाऊक नाही. परिस्थितीमुळे की चेंडूमुळे अधिक स्विंग मिळत असल्याचा माझा अंदाज आहे. ते काहीही असो चेंडू स्विंग होत असल्याने मला आनंद झाला आहे.”
भुवनेश्वरने मागील दोन सामन्यात २५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा एकच हेतू असा की, चेंडू स्विंग होत असेल तर तो आक्रमक गोलंदाजी करत अधिक विकेट्स घेण्याचा प्रयत्न करणार. अशीच रणनीती आखत त्याने मागील दोन विजयी सामन्यात महत्वाची भुमिका बजावली आहे.
“जेव्हा चेंडू स्विंग होतो, तेव्हा माझ्याकडून गोलंदाजी उत्तम होते. सपाट खेळपट्टीवर फलंदाज आक्रमक होतात. ते मोठे शॉट्स मारण्याचा प्रयत्न करत होते मात्र आता चेंडू स्विंग झाल्याने त्यांनी लवकर विकेट गमावली. येथे स्वत:च्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे,” असेही भुवनेश्वरने पुढे म्हटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी भारताला शिव्या घालायचा आणि आता मात्र कौतुक करतोय, पाहा पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे ट्वीट
पाकिस्तानी अंपायरने चुकीचा निर्णय देऊन देखील ‘लिटल मास्टर’ने मोडला होता ब्रॅडमन यांचा विक्रम
‘…हेच भारताच्या विजयाचे प्रमुख कारण’, इंग्लंडच्या दिग्गजाने केले टीम इंडियाचे कौतुक