भारतीय संघाला गुरुवारी (७ जुलै) इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना खेळायचा आहे. उभय संखातील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडला शेवटच्या डावात ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण त्यानी हे लक्ष्य गाठले आणि कसोटी मालिका बरोबरीने सोडवली. टी-२० मालिकेत मात्र भारतीय संघ इंग्लंडपेक्षा कमजोर दिसत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळलेल्या खेळाडूंना पहिल्या टी-२० सामन्यात विश्रांती दिली गेली आहे. रोहित शर्मा या सामन्यात खेळेस, याची खात्री दिली गेली नाहीये. इंग्लंडच्याही वरिष्ट खेळाडूंना टी-२० मालिकेतदरम्यान विश्रांती दिली गेली आहे, परंतु त्यांचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) भारतीय संघासाठी मोठी बाधा ठरू शकतो. इंग्लंडमध्ये भारताने आतापर्यंत ६ टी-२० सामने खएळले आहेत आणि त्यापैकी फक्त २ सामने संघाला जिंकता आले नाहीत. इंग्लंडने मात्र राहिलेले चारही सामने जिंकले.
भारतीय आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २००९ साली खेळला गेला होता. इंग्लंडने हा सामना ३ धावांनी जिंकला होता. त्यानंतर २०११ मध्ये या दोन संघांत दुसरा टी-२० सामना खेळला गेला, जो इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला. त्यानंतर २०१४ मध्ये जेव्हा भारतीय संघा पुन्हा एकदा इंग्लडविरुद्ध टी-२० सामना खेळला, तेव्हा संघाला ३ धावांनी पराभव मिळाला होता.
भारतीय संघाने इंग्लंडचा टी-२० सामन्यात पहिल्यांदा २०१८ मध्ये पराभूत केले. मॅनचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. कुलदीप यादवने या सामन्यात २४ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तारत भारतासाठी केएल राहुलने १०१ धावाची खेळी केली होती. भारताने हा सामना १८.२ षटकांमध्ये जिंकला. त्यानंतर भारतीय संघाने मालिकेतील तिसरा सामनाही ७ विकेट्सने जिंकला. या विजायनंतर भारताने मालिकेत २-१ असा विजय मिळवला. रोहित शर्माने या शेवटच्या सामन्यात नाबाद १०० धावा केल्या होत्या.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील सध्याच्या टी-२० मालिकेचा विचार केला, तर केएल राहुल दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाहीये. तसेच कर्णधार रोहित शर्माही चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. चाहत्यांना रोहितकडून या मालिकेत चांगल्या प्रदर्शाची अपेक्षा आहे. संघात इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा यांच्याकडूनही चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. हुड्डाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात हुड्डाने शतक ठोकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या स्टार टेनिसपटूबाबत मोठी बातमी! बहुतेक करियरला पण ‘फुलस्टॉप’
जॉसची इंग्लंड पडणार रोहितच्या टीम इंडियवर भारी!, भारताच्या माजी दिग्गजानेच केलाय दावा