---Advertisement---

ENGvsIND: चेतेश्वर पुजारा नाही तर ‘हा’ खेळाडू कॅप्टन शर्मासोबत येणार सलामीला, बीसीसीआयने दिले संकेत

On: मंगळवार, जून 21, 2022 12:54 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहे. १ जुलैपासून सुरू होणारा हा एकमेव कसोटी सामना पूर्वनियोजित आहे. मागील वर्षी कोरोनामुळे भारतीय संघाला पाच सामन्यांची कसोटी मालिका अर्ध्यावरच सोडून यावे लागले होते. या मालिकेत भारत २-१ असा पुढे आहे. या कसोटी सामन्यास केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे मुकला असून त्याच्या जागी कोण सलामीला येणार याची चर्चा सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेयर करत सगळ्यांना चकित केले आहे.

या व्हिडिओमध्ये भारताचे खेळाडू लीसेस्टरशायर येथे रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. याला बीसीसीआयने ‘भारताचे सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गील (Shubman Gill) हे नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना’, असे कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/tv/CfBkbLGjIpL/?utm_source=ig_web_copy_link

रोहित आणि शुबमनचा हा व्हिडिओ टाकताच हे दोघे इंग्लंडविरुद्ध सलामीला येणार का अशा चर्चा होत आहेत. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने संघात पुनरागमन केले आहे. मात्र तो सलामीला येणार नाही. राहुल दुखापतग्रस्त असल्याने तो या संपूर्ण मालिकेत खेळणार नाही. त्याच्या जागी बीसीसीआयने कोणत्याच खेळाडूंची घोषणा केली नाही, तर मयांक अग्रवाल हा त्याच्या जागी उत्तम पर्याय ठरू शकतो. या महत्वाच्या सामन्याआधी भारतीय संघ लीसेस्टरशायर विरुद्ध २४ ते २७ जून दरम्यान एक सराव सामना खेळणार आहेत.

भारताकडे २००७नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. यासाठी भारताला बर्मिंघमच्या एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात जिंकावे लागेल किंवा सामना अनिर्णीत ठेवावा लागेल. मात्र हे दिसते तेवढे सोपे वाट नाही. नुकतेच इंग्लंडच्या संघाने कसोटी चॅम्पियन न्यूझीलंड संघाला दोन सामन्यात पराभूत केले आहे. या सामन्यातून रोहित प्रथमच विदेशी मैदानावर नेतृत्व करणार आहे.

हा सामना भारताने जिंंकला किंवा अनिर्णीत राहिला तर भारत प्रथमच इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्याचा इतिहास रचेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

कसोटी क्रिकेटमध्ये ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विराट कोहलीने अनलॉक केला आपला लॅपटॉप

चालू सामन्यात अपांयरिंग सोडून कुमार धर्मसेना चक्क बनले फिल्डर, Video व्हायरल

आयर्लंड दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सना दिली मोठी भेट, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---