---Advertisement---

भारत-इंग्लंड संघामधील कसोटी सामना पुन्हा कधी खेळवला जाऊ शकतो? वाचा सविस्तर

On: शनिवार, सप्टेंबर 11, 2021 6:16 PM
Joe Root and Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि त्यानंतर फिजियो योगेश परमार हे कोरोना संक्रमित आढळले. त्यानंतर पाचव्या कसोटीत नाणफेक होण्याच्या दोन तास आधी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामना रद्द झाल्यानंतर हा सामना नंतर खेळला जाण्याची आशंका व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयच्या सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले आहे की, “बीसीसीआय आणि ईसीबी यांच्यातील मजबूत संबंध पाहता बीसीसीआयने ईसीबीला रद्द झालेला सामना पुन्हा आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही बोर्ड या कसोटी सामन्याला पुन्हा आयोजित करण्याच्या दिशेने काम करत आहेत.”

शाह यांनी सांगितले की, “बीसीसीआय आणि ईसीबीने कसोटी सामन्याच्या आयोजनावर वाट काढण्यासाठी अनेक सत्रात चर्चा केली, मात्र भारतीय संघात कोविड-१९ प्रकरणे सापडल्यामुळे ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. बीसीसीआय नेहमीच म्हणत आले आहे की खेळाडूंची सुरक्षा सर्वप्रथम आणि त्यात कसलाही तडजोड केली जाणार नाही.”

ही कठीण परिस्थितीत समजून घेतल्याबद्धल शाहने ईसीबीचे आभार व्यक्त केले आहेत. ते म्हणाले, “बीसीसीआय या कठीण काळात सहकार्य आणि समजून घेतल्याबद्धल ईसीबीचे आभार मानते. आम्ही प्रशंसकांचीही ही रोमांचक मालिका पूर्ण न करता आल्यामुळे माफी मागतो.”

पाचवा सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने सांगितले की, दोन्ही बोर्ड कोणत्यातरी दुसऱ्या दिवशी सामना पुन्हा आयोजित करण्यासाठी काम करत आहेत. आशात ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ईसीबी) टाॅम हॅरिसन यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी यानंतर जो कसोटी सामना आयोजित केला जाईल तो कसोटी मालिकेचा भाग नसून एकमात्र असेल, अशी माहिती दिली.

हॅरिसनने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले, “नाही, मला वाटते की, ही एकमात्र कसोटी असेल. आमच्यापुढे काही अन्य पर्याय मांडले गेले आहेत, शक्यतो त्यांच्यावर विचार करणे गरजेचे आहे.” पुढे बोलाताना ते म्हणाले, ” आता आमचा प्रयत्न आहे की, मैदानावर भारताविरुद्ध एक कसोटी सामना खेळण्यासाठी शक्यता शोधायची आहे. याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आजची एकमात्र चांगली बातमी आहे.”

भारतीय संघ कसोटी मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे, आशात मालिकेचा अंतिम निकाल येण्यासाठी पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जाणे गरजेचे आहे. बीसीसीआयने सामना कोणत्यातरी दुसऱ्या दिवशी आयोजित केला जावा यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. असे म्हटले जात आहे की जुलै २०२२ मध्ये जेव्हा भारत मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे, तेव्हा हा कसोटी सामना आयोजित केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

मँचेस्टर कसोटी रद्द होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना व्हॉट्सऍपवर नक्की काय आले होते मेसेज?

भारतीय संघाकडून अशा कोणच्या ३ चूका घडल्या, ज्यामुळे पाचवा कसोटी सामना झाला रद्द

भारतीय संघ पाचव्या कसोटीत मैदानात का उतरला नाही? दिनेश कार्तिकने सांगितले खरे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---