कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ दिवसेंदिवस उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली आहे. मालिकेतील भारतीय संघाच्या प्रदर्शनानंतर कर्णधार विराट कोहलीचे सर्वत्र कैतुक केले जात आहे. तत्पूर्वी संघ निवडीबाबत त्याच्यावर भरपूर टीका केल्या गेल्या होत्या.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या निवडीबाबत खूप गोंधळ पाहायला मिळाला आहे. मालिकेतील आतापर्यंत झालेल्या चारही कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात संधी मिळालेली नाही. त्यामुळे विराटवर बऱ्याच टीका झाल्या होत्या. आता चौथ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर त्याला पुन्हा अश्विनला संघात स्थान न दिल्याबद्दल प्रश्न विचारला गेला. विराटने याचे उत्तर देताना म्हटले की, तो आकड्यांवर जात नाही. जे खेळाडू संघाच्या संतुलनात बसतात त्यांच्यासोबतच तो मैदानात उतरतो.
चौथ्या कसोटीनंतर विराटला संघ निवडीबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, “आम्ही संघ निवडीवेळी खेळाडूंचे ऍनालिसीस, आकडे किंवा गुण यांच्यावर कधीच जात नाही. आम्हाला माहित आहे की, आम्हाला आमचा निर्णय काय ठेवायचा आहे आणि एका संघाच्या रूपात मिळून निर्णय घ्यायचा असतो. ड्रेसिंग रूममध्ये ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे.”
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची लागण झाली आहे. त्याविषयी बोलताना विराटने हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की, “हे दुर्भाग्यपूर्ण आहे की, रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचे तीन सदस्य येथे नाहीत. यामुळे आम्हाला पुढचा कसोटी सामना जिंकण्यासाठी आणखी प्रेरणा मिळेल. आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे, आम्ही केवळ संधी मिळण्याची वाट पाहत आहोत.”
दरम्यान अश्विनला चौथ्या कसोटी सामन्यातही संधी न मिळाल्यामुळे विराटवर प्रश्न उपस्थित झाले होते. चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी जेव्हा भारतीय संघाला विकेट्स मिळत नव्हत्या. तेव्हा त्याच्यावर खूप टीका झाल्या होत्या. त्याच्या नेतृत्वावरही खूप प्रश्न उपस्थित गेले होते. अनुभवी अश्विनच्या जागी भारतीय संघाने फिरकी गोलंदाजाच्या रूपात रविंद्र जडेजाला संधी दिली आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर संघाने मालिकेतही २-१ अशी आघाडी मिळवली आहे. आता मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या ओव्हलवरील थरारक विजयानंतर कैफचा जबरदस्त ‘नागिन डान्स’, व्हिडिओवरुन नाही हटणार नजर
‘थँक्यू विराट!’, कर्णधार कोहलीच्या कसोटी प्रेमावर प्रभावित झाला महान ऑसी गोलंदाज
ओव्हलच्या ऐतिहासिक विजयावर गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया की माजी इंग्लिंग कर्णधाराला लागली मिर्ची