भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने भारतीय संघावर आघाडी घेतली आहे. याचे मोठे कारण ओली पोप-जाॅनी बेयरस्टो आणि ओली पोप-मोईन अली या दोन भागिदाऱ्या ठरल्या. दुसऱ्या दिवशी यांनी प्रत्येकी अर्धशतकी भागीदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान भारतीय गोलंदाजीवेळी संघाकडून एक मोठी चूक झाली आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवेळी मोईन अली बाद झाला होता. मात्र, भारताच्या एकाही खेळाडूने अपील केली नाही.
सामन्याच्या दुसऱ्या डावात बुमराह इंग्लंडला ६० वे षटक टाकत होता. त्याने गोलंदाजीवेळी मोईन अलीच्या पॅडवर जबरदस्त यार्कर मारला होता. पण बुमराह आणि एकाही भारतीय खेळाडूने विकेटसाठी अपील केली नाही. त्यानंतर रीप्लेमध्ये दिसले की, मोईन अली पायचित झाला होता. अगोदर भारतीय खेळाडूंना असे वाटले होते की, चेंडू मोईनच्या बॅटवर लागला आहे. पण तसे झाले नाही. चेंडू बॅटच्या आधी त्याच्या पॅडला लागला होता आणि मोईन बाद झाला होता.
त्याला अशाप्रकारे जीवनदान मिळणे हे भारतीय संघाला किती महागात पडेल? हे सामन्याच्या शेवटच्या दिवशीच कळेल.
Moeen Ali was out from the yorker of Bumrah but no-one appealed as everyone thought it's bat first.
— Johns. (@CricCrazyJohns) September 3, 2021
Moeen Ali's LBW in Jasprit Bumrah's over was out which was given not out and no reviews were taken. pic.twitter.com/cPoelnT1GM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 3, 2021
Jasprit Bumrah Deserve wicket here, but no one appealed and Moeen Ali survives. #INDvENG pic.twitter.com/ydJjOdXIH5
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 3, 2021
Moeen ali was out in jasprit bumrah over but umpire denied and no review was taken #INDvENG pic.twitter.com/x45nGRkv58
— The Global Sports (@GlobalSportsHQ) September 3, 2021
https://twitter.com/CricCrazyMrigu/status/1433795899600224266?s=20
जडेजाने केले मोईन अलीला झेलबाद
असे असले तरीही, भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजाने मोईन अलीला त्यानंतर ७ षटकांनी बाद केले. जडेजाच्या गोलंदाजीवेळी त्याने मोठा शाॅट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मारलेला चेंडू रोहित शर्माच्या हातात विसावला. मोईनने बाद होण्याआधी ओली पोपसोबत १२१ चेंडूत ७१ धावांची भागीदारी पार पाडली. तसेच याआधी जाॅनी बेयरस्टो आणि ओली पोप यांनीही १३९ चेंडूत ८९ धावांची भागीदारी साकारली होती.
भारतीय संघाला डावाच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज उमेश यादवने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने आधी क्रेग ओवरर्टनची विकेट घेतली आणि त्यानंतर डेविड मलानलाही तंबूत पाठवले. त्याच्या या कामगिरीनंतर असे वाटले होते की, भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या संघाला स्वस्तात गुंडाळतील.
मात्र, या कसोटी मालिकेतील त्याचा पहिला सामना खेळणारा ओली पोपोने संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. त्याने बेयरस्टोसोबत भागिदारी करून भारतीय गोलंदाजांना प्रत्युत्तर दिले. या दोन फलंदाजांनी शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराजच्या १० चेंडूंवर ७ चौकार मारले. पोपचे इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आणि त्याने आप्रतिम प्रदर्शन करत अर्धशतक केले आहे. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात २९० धावा केल्या असून भारतीय संघावर ९९ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जार्वोच्या एन्ट्रीवर जाफरने ‘हे’ फनी मीम शेअर करत इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेची उडवली खिल्ली
ओव्हलच्या मैदानावर उमेश यादवचा मोठा कारनामा! ‘या’ विक्रमाच्या बाबतीत केली जहीर खानची बरोबरी
ऑली पोपने शार्दुलला दिला चांगलाच चोप, एकाच षटकात ठोकले सलग ४ चौकार, पाहा व्हिडिओ