भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाचे गोलंदाज सध्या अप्रतिम प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या दुसऱ्या कसोटीतील कामगिरीचे कौतुक जगभर होत आहे. त्यांच्या कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघाने हातातून निसटत चाललेला दुसरा सामना जिंकला होता.
यानंतर आता तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडे २-० अशी आघाडी घेण्याची संधी असेल. तसेच इंंग्लंडचा संघ मालिकेत भारताची बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. यादरम्यान इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानने भारतीय गोलंदाजांविषयी त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंडने तिसऱ्या सामन्याआधी संघात काही बदल केले आहेत. लाॅर्ड्सवर ५ बळी घेणारा वेगवान गोलंदाज मार्क वुड याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात सहभागी होणार नाही. तसेच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज डाॅम सिबली याला तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नाही. त्याच्याजागी डेविड मलान पुन्हा संघासोबत जोडला गेल्याने इंग्लंडची फलंदाजी मजबूत झाली आहे.
मलानने तिसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मला वाटते की, भारतीय संघाचे नेतृत्व अप्रतिम प्रकारे केले गेले आहे. माझे मत आहे की, विराट ज्याप्रकारे त्याचे काम करतो, त्यात त्याची विजयाची भूक दिसते. तुम्हाला माहित आहे तो खूप लोकांचे लक्ष त्याच्याकडे आकर्षित करतो. त्यांच्या केवळ फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही खूप खोली आहे. त्यांच्याकडे असे गोलंदाज आहेत, जे प्रत्येक परिस्थितीत कसोटी सामने जिंकू शकतात. त्यांच्या संघाकडे खूप पर्याय आहेत आणि कठोर आव्हान देणारे गोलंदाजही आहेत.”
३३ वर्षीय मलानने २०१८ मध्ये बर्मिंघममध्ये भारतीय संघाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रीकेविरुद्ध त्याच्या कसोटीत कारकिर्दीची सुरुवात केली होती. आजपर्यंत त्याने १५ कसोटी सामन्यांत ७२४ धावा केल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत त्याला प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, “वास्तवात मी माझ्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्या क्रमांकावर जास्तवेळा फलंदाजी केलेली नाही. मी फक्त २५-३० वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलो केले असेल. मी प्रयत्न करेल की मी तिसऱ्या क्रमांकावर त्याचप्रकारे खेळू शकेल, ज्यासाठी मी ओळखला जातो.”
महत्त्वाच्या बातम्या-
कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना? जाणून घ्या एका क्लिकवर