क्रिकेटविश्वातून सध्या वर्णभेद आणि वंशभेदाला कडाडून विरोध होताना दिसत आहे. गेल्या काही काळात वांशिक आणि वर्णभेदाला बळी पडत आहेत. नुकतेच झालेले प्रकरण इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा मित्र अझीम रफिकशी संबंधित आहे. रफीक यॉर्कशायर संघासाठी २००८ – २०१७ दरम्यान काउंटी क्रिकेट खेळला. या दरम्यान त्याला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. आता या प्रकरणावर रूटने भाष्य केले आहे.
तो म्हणाला की, माझा माजी यॉर्कशायर संघातील सहकारी अझीम रफीकला वांशिक शोषणाचा सामना करावा लागला, हे जाणून मला खूप दुःख झाले आहे.
माध्यमांशी केलेल्या संभाषणात रूटने इंग्लंडच्या क्रिकेट व्यवस्थेतून सर्व प्रकारचे भेदभाव संपवण्याविषयी मत मांडले. तो म्हणाला की, “माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे की, काही लोकांनी सहकारी खेळाडूशी गैरवर्तन केले.” तो म्हणाले की, “मी अहवालावर खरोखरच जास्त काही सांगू शकत नाही. जे मी आत्तापर्यंत पाहिले नाही. पण माजी संघातील सहकारी आणि मित्र म्हणून अजीमला अशा प्रकारे दु:खी होताना पाहणे माझ्यासाठी कठीण आहे.”
इंग्लंडच्या क्रिकेट व्यवस्थेत सुधारणा हवी: रूट
इंग्लंडचा कर्णधार पुढे म्हणाला की, ही गोष्ट आपल्याला दाखवते की क्रिकेटच्या सुधारणेसाठी आपल्याकडे अजून बरेच काम आहे. माझ्या मते हा प्रश्न अधिक सामाजिक आहे. एक खेळ म्हणून, आपण नेहमी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा विषयावर पुन्हा बोलू नये. तो म्हणाला की, हेडिंग्ले येथे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंड संघ भेदभावाविरोधी टी-शर्ट परिधान करेल आणि याद्वारे एकतेचा संदेश देईल.
यॉर्कशायर संघाने रफिकची माफी मागितली
रफीकने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, यॉर्कशायरकडून खेळताना त्याने अनेक वेळा वांशिक भेदभावाची तक्रार केली होती. परंतु, त्याच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिले नाही. तो म्हणाला की, “मला स्वतःला संघाबाहेर असल्याचे वाटत होते. त्या काळात मी आत्महत्या करण्याच्या खूप जवळ होतो? मी माझ्या कुटुंबाच्या व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करत होतो. मात्र, मी आतून रोज मरत होतो. मी कामावर जायला घाबरत होतो. मला रोज वेदना जाणवत होत्या.”
नंतर या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. ज्यात असे आढळून आले की, इंग्लंडचा १९ वर्षांखालील कर्णधार अझीम रफिक अन्यायकारक वागणुकीचा बळी बनला होता. अलीकडेच, काउंटी संघ यॉर्कशायरने रफिकची माफी देखील मागितली होती.
पाकिस्तानी मुळ असलेल्या ३० वर्षीय रफिकने ३९ प्रथम श्रेणी, ३५ लिस्ट-ए आणि ९५ टी -२० सामने खेळले आहेत. रफिकने टी -२० मध्ये १०२, लिस्ट-ए मध्ये ४३ आणि प्रथम श्रेणीमध्ये ७२ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीची ‘मोठी’ कारवाई! यावर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या ‘या’ खेळाडूच्या गोलंदाजीवर बंदी
त्यावेळी जो रूटने ‘असे’ करायला नको होते, संघसहकारी अँडरसननेच दाखवून दिली मोठी चूक
तुम्ही स्लेजिंगवर लक्ष केंद्रित करत आहात का? अजिंक्य रहाणेने दिले ‘असे’ उत्तर