इंग्लंडचा क्रिकेटप्रेमी डॅनियल जार्वो सध्या इंटरनेटवर सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या लाॅर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर खेळ सुरू झाल्याबरोबर जार्वोने भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उडी मारली होती. मैदानात पोहोल्यावर जार्वो असा वर्ताव करू लागला जसा की, तो भारतीय संघाचा भाग आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर खूप व्हायरल झाला होता.
शेवटी सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याला मैदानातून बाहेर काढावे लागले होते. त्याचा हा कारनामा पाहून मैदानात क्षेत्ररक्षणाला थांबलेला मोहम्मद सिराजला हसू आवरले नव्हते. त्याच्या या कारनाम्याने त्याला चांगलेच लोकप्रिय बनवले आहे.
JARVO! full video of India Vs England Cricket at lords. 1st white Indian player.
FULL VIDEOS HERE:
Facebookhttps://t.co/A3pqzXJPO5
YouTubehttps://t.co/UPOnC2L00V@bmwjaro pic.twitter.com/NYbnLKshXL— Jarvo69 (Daniel Jarvis) (@BMWjarvo) August 15, 2021
दुसऱ्या कसोटीनंतर आता त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो मैदानाच्या आत चालू सामन्यात तंबू लावून सामन्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ ऍशेज मालिकेतील आहे.
ऍशेज मालिकेतील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात जार्वो अचानक मैदानात आत जातो. पटकन तंबू लावण्याचा प्रयत्न करतो. तंबू लावल्यानंतर तो आरामात सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. त्यानंतर काही क्षणात सुरक्षा कर्मचारी त्याला मैदानाबाहेर घेऊन जाताना व्हिडिओत दिसत आहेत. समाजमाध्यमांवर लोक जार्वोचा हा कारनामा पाहून खूप खुश दिसत आहेत आणि त्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका वापकर्त्याने लिहीले आहे की, ‘जार्वो त्याचे सर्वोत्तम आयुष्य जगत आहे.’
इंग्लंड आणि भारतातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लाॅर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सामना जिंकला. भारतीय संघाने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टपासून लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला जाणार आहे. हे मैदान भारतीय संघासाठी आजपर्यंतच्या इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत सामन्यांत चांगले ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुढील तीन महिने चाहत्यांसाठी पर्वणी! युएईत भरणार क्रिकेट कार्निवल
विराटच नव्हे ‘या’ लिजेंडच्याही कारकिर्दीत पडला होता शतकाचा दुष्काळ, निवृत्तीचे मिळाले होते सल्ले
लॉर्ड्स कसोटीत तब्बल १५ नो बॉल टाकणाऱ्या बुमराहसाठी ‘या’ दिग्गजाचा मदतीचा हात, सांगितला उपाय






