---Advertisement---

विराटच नव्हे ‘या’ लिजेंडच्याही कारकिर्दीत पडला होता शतकाचा दुष्काळ, निवृत्तीचे मिळाले होते सल्ले

On: गुरूवार, ऑगस्ट 19, 2021 4:05 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फालंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु गेल्या २ वर्षांपासून त्याला शतक झळकावण्याची वाट पाहावी लागतेय. नुकताच इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ कसोटी सामन्यात देखील त्याला शतक झळकावण्यात अपयश आले आहे. परंतु अनेकांना माहीत नसेल की, विराट कोहलीच नव्हे तर सचिन तेंडूलकरसारख्या दिग्गज फलंदाजालाही शतक झळकावण्यासाठी वाट पाहावी लागली होती.

खेळाडूंच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येत असतात. फलंदाज चांगली कामगिरी करत असेल तर तो शतक झळकावून संघाला सामना जिंकून देत असतो. परंतु जेव्हा तो फ्लॉप ठरत असतो, तेव्हा त्याला अनेक महिने शतक झळकावण्यासाठी वाट पाहावी लागते. असेच काहीसे विराट कोहलीसोबत पाहायला मिळत आहे. २१ महिने आणि ४९ डाव उलटून गेले. तरी देखील विराट कोहलीची ही प्रतीक्षा अजून सुरूच आहे.(Sachin Tendulkar could not score a single century in 34 innings in 2007)

विराट कोहलीच नव्हे तर सचिन तेंडुलकरलाही शतक ठोकण्याची भरपूर वाट पाहावी लागली होती. २००७ मध्ये सचिन आपल्या कारकीर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी तर अनेकांनी मागणी देखील केली होती की, सचिनने निवृत्ती घ्यायला हवी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके करणाऱ्या सचिनला २००७ मध्ये ३४ डावात एकही शतक झळकावता आले नव्हते. इतकेच नव्हे तर कारकिर्दीतील ९९ शतक पूर्ण केल्यानंतर त्याला १०० वे शतक झळकावण्यासाठी देखील भरपूर वाट पाहावी लागली होती.

विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा बाबतीत सचिन तेंडुलकर १०० शतकांसह पहिल्या स्थानी आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत ७१ शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली या यादीत ७० शतकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

वनडेमध्ये मोठा कारनामा करण्यासाठी ६ पाऊल दूर विराट
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये २५४ डावात एकूण ४३ शतक झळकावले आहेत. तो सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम तोडण्यापासून फक्त ६ पाऊल दूर आहे. सचिनच्या नावे वनडे क्रिकेमध्ये ४९ शतकांची नोंद आहे. येणाऱ्या काळात विराटने ६ शतक ठोकले तर तो सचिनचा विक्रम मोडून ५० शतक करणारा एकमेव फलंदाज ठरू शकतो. तसेच तो वनडे क्रिकेटमध्ये ५० शतक झळकावणारा एकमेव फलंदाज देखील ठरू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

हेडिंग्ले कसोटीत पुनरागमनाच्या इराद्याने उतरणार इंग्लंड, असा असेल फलंदाजी क्रम

‘तू वर्ल्ड क्लास गोलंदाज’; महिला पत्रकार बनली सिराजची चाहती, लॉर्ड्समधील प्रदर्शनाची केली स्तुती

भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या क्रिकेटरचा अडवला रस्ता, मैदानावर जात असताना मुद्दाम उभे राहिले रस्त्यात!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---