इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजी आक्रमण सतत अपयशी ठरलेले दिसत आहे. यामध्ये संघाच्या मधल्या फळीचे गोलंदाज संघासाठी मालिकेत काही खास कामगिरी करू शकले नाहीत. भारतीचा अनुभवी फलंदाज आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फार्मशी झगडत आहे. तो या मालिकेत काही कमाल करू शकला नाही आणि त्यामुळेच तो चाहत्यांच्या टीकेचा धनी होत आहे.
यावर्षी अजिंक्य रहाणेने भारतीय संघासाठी एकही मोठी खेळी केलेली नाही. खराब फॉर्म आणि संघात मिळणाऱ्या संधीमुळे त्याच्यावर टीका होत आहेत. आता त्याच्यावर टीका करणाऱ्यांच्या यादीत आणखी एका माजी खेळाडूचे नाव सामील झाले आहे. पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने रहाणेवर टीका केली आहे. त्याने रहाणेच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केला आहे आणि भारतीय संघाला त्याच्याविषयी विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
दानिश कनेरिया त्याच्या यूट्यूब चॅनलवर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीविषयी बोलला आहे. तो म्हणाला, “भारताचा मध्यक्रम पुन्हा एकदा ढासळला. अजिंक्य रहाणे या कसोटी मालिकेत वाईट प्रकारे अपयशी ठरला आहे. मला वाटते की, आता वेळ आली आहे. भारतीय संघाने रहाणेच्या स्थानावर विचार केला पाहिजे.”
त्याने संघात नवीन खेळाडूंना संधी देण्याविषयी म्हटले, “मला समजत नाहीये की, सूर्यकुमार यादव आणि हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान का मिळत नाहीये? सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शाॅ ला श्रीलंका दौऱ्यावरून सरळ इंग्लंड दौऱ्यावर बोलावले गेले. आपण सर्व पाहत आहोत की, अजिंक्य रहाणे खराब फार्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादवविषयी बोलायचे तर, तो प्रत्येक परिस्थितीत धावा करणारा फलंदाज आहे. माझ्या हिशोबाने त्याला भारतीय संघात संधी दिली गेली पाहिजे.”
अजिंक्य रहाणे मागच्या अनेक सामन्यांपासून खराब फार्मशी झगडत आहे. त्याने मागच्या काही काळात संघासाठी विशेष काही केलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने ५, १, ६१, १८, १०, १४ अशी कामगिरी केलेली आहे. मालिकेत लाॅर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने ६१ धावा केल्या होत्या. मात्र, त्याच्यानंतर पुन्हा त्याला तशी कामगिरी करता आलेली नाही. नुकतेच लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावातही तो भोपळाडी न फोडता बाद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या ‘हिट शो’ पुढे अँडरसन बेजार, चौकार गेल्यानंतर असा व्यक्त केला राग; तुम्हीही पाहा
‘वैयक्तिक कटुतेमुळे अश्विनला संघात स्थान दिले नाही’, कर्णधार कोहलीवर विरोधी संघातून जहरी टीका
ओव्हलमध्ये ६१ धावांची उपयुक्त खेळी करुनही पुजारा नाखुश; म्हणाला, ‘पुढच्या सामन्यात शतक ठोकणार’