---Advertisement---

किती हा क्रूरपणा!! या भारतीय गोलंदाजाच्या फोटोचे अंडरसनने केले तुकडे-तुकडे, व्हिडिओ झाला व्हायरल

On: शुक्रवार, ऑगस्ट 20, 2021 2:29 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. भारतीय संघाने या विजयासोबतच कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन आणि भारतीय खेळाडू यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर बऱ्याचदा दोन्ही संघांतील खेळाडूंचा एकमेकांसोबत वाद झालेला दिसला. अशातच आता अंडरसनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या फोटोचे तुकडे करताना दिसत आहे.

आयपीएल २०१९ मध्ये फिरकी गोलंदाज आर अश्विनने इंग्लंडचा फलंदाज जाॅस बटलरला मांकडिंग प्रकाराने बाद केले होते. नियमांप्रमाणे पंचांनी बटलरला बाद करार दिला. या घटनेनंतर खूप विवाद झाला होता. यानंतर बीबीसी वाहिनीवरील एका कार्यक्रमात जेम्स अंडरसनने आर अश्विनच्या फोटोचे तुकडे-तुकडे करताना दिसत आहे.

हा जुना व्हिडिओ आता पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर क्रिकेटच्या चाहत्यांनी अंडरसनला चांगलेच धारेवर धरले आहे. अश्विन सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. मात्र, त्याला या दौऱ्यात अजून संघासाठी एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली.

जेम्स अंडरसन आणि भारताच्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये वाद झाला होता. दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने जेम्स अंडरसनला वेगवान बाउंसर टाकले होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अंडरसन बुमराहला काहीतरी बोलताना दिसला होता.

त्यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी तो गोलंदाजी करताना खेळपट्टीच्या मध्ये पळताना दिसल होता. हे पाहून भारतीय कर्णधार विराट कोहलीलाही त्याचा राग आला होता. भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकला. कसोटी मालीकेतील तिसरा सामना लीड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तालिबान संकटानंतरही पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळणार अफगाणिस्तान, ‘या’ देशात होणार सामने

बिग बींसमोर हॉट सीटवर असणार ‘हे’ २ दिग्गज क्रिकेटर्स; ‘केबीसी १३’चा पहिलाच एपिसोड होणार झक्कास

टी२० पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजासाठी आयपीएल संघांमध्ये रस्सीखेच, विश्वचषकासाठीही झालीय निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---