इंंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहाने अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने केलेली कामगिरी भारतीय संघाच्या विजयात मोलाची ठरली आहे. सामन्यानंतर त्याने त्याची पत्नी संजना गणेशनसोबत एक फोटा शेयर केला आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत तो त्याची पत्नी संजना गणेशनसोबत आनंदात दिसत आहे. या जोडीचा हा फोटो चाहत्यांना खुप आवडल्याचे दिसत आहे. या फोटोला इंस्टाग्रामवर आर्ध्या तासात २.५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.
बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या परिवाराला इंग्लंड दौऱ्यावर सोबत नेण्यासाठी परवानगी दिली आहे. इंग्लंड दौरा जास्त काळ चालणार असल्यामुळे ही परवानगी देण्यात आली आहे. याआधी रोहित शर्माची पत्नी रितिकानेही एक फोटो शेयर केला होता, ज्यात तिच्यासोबत रोहित आणि शार्दुल ठाकुर दिसत होते.
https://www.instagram.com/p/CSwkusAKKwI/?utm_source=ig_web_button_share_sheet
जसप्रीत बुमराहने गाजवली लॉर्ड्स कसोटी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. आतापर्यंत मालिकेतील दोन सामने खेळले गेले असून त्यातील दुसरा सामना भारताने जिंकला आहे. दुसऱ्या सामन्यात बुमराहाने सांभाळून फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. त्यावेळी त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी मार्क वुडने त्याच्यावर स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केले होते. त्यानंतर बुमराह खुप नाराज झाला होता. बुमराहाने या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीतही अप्रतिम प्रदर्शन केले आणि इंग्लंडला स्लेजिंगचे उत्तर दिले.
बुमराहने ऐतिहासीक लाॅर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघासाठी ३ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. सोबतच संघासाठी फलंदाजीत ९ व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसोबत अप्रतिम भागिदारी रचली. या दोघांच्या भागिदारीमुळे भारतीय संघ इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान देऊ शकला आणि नंतर सामनाही जिंकू शकला. भारताने मिळवलेल्या या विजयानंतर मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
युएईत घोंगावणार मुंबईकरांचे वादळ, अर्जुनसह ‘हे’ खेळाडू हॉटेलच्या रूममध्ये करतायत कसून सराव
AK-47 हाती घेऊन अफगाणी क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसले तालिबानी, माजी क्रिकेटरही दिसला सोबत