भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही काहीच कमाल करू शकला नाही. पुजाराने या कसोटी मालिकेत ५ डावात १७.७५ च्या मामुली सरासरीने केवळ ७१ धावा केल्या आहेत. तरीदेखील, दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर तो फार्मात आल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, तो तिसऱ्या कसोटीत त्याचे प्रदर्शन कायम राखू शकला नाही. पुजारा मागच्या काही काळापासून खराब फाॅर्ममध्ये दिसतोय. दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वाॅन याने पुजारावर जोरदार टीका केली आहे.
सध्या समालोचक म्हणून काम करत असलेला वॉन एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,
“पुजारा समुद्राकडे पाहतो. असे वाटते की, तो कोठेतरी हरवला आहे. त्याचे डोके फिरले आहे आणि तो त्याची खेळाची शैली विसरत चाललाय. मला असे वाटते की, तो केवळ अस्तित्वासाठी खेळतोय. अँडरसनला पुजाराला बाद कराण्याची युक्ति सापडलीये. चेंडू स्विंग होत असताना पुजारा दबावामध्ये येतोय.”
भारतीय फलंदाज अस्तित्वासाठी झगडत आहेत
वाॅनने यानंतर आपला मोर्चा भारतीय फलंदाजांकडे वळवताना म्हटले,
“सगळे भारतीय फलंदाज केवळ त्यांच्या अस्तित्वासाठी खेळताना दिसत होते. रोहित एवढा चांगला खेळाडू आहे. तरीही तो जवळपास फक्त अस्तित्वासाठी खेळताना दिसत होता. जडेजा अस्तित्वासाठीच झगडतोय. तुम्ही रिषभ पंतला पाहू शकता. तो अर्धवट मनाने फटके खेळतोय. हा तो पंत नाही.”
वॉनने याच दरम्यान इंग्लंडच्या गोलंदाजांचे व संघाच्या मानसिकतेचे कौतुक केले.
तिसऱ्या कसोटीत गडगला भारतीय संघ
लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हेडिंग्ले येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे गर्वहरण झाले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी मजबूत भारतीय फलंदाजी केवळ ७८ धावांत केली. रोहित शर्मा व अजिंक्य राहाणे व्यतिरिक्त कोणताही भारतीय फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. इंग्लंडसाठी अनुभवी जेम्स अँडरसन व क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. ओली रॉबिन्सन व सॅम करन यांच्या देखील पारड्यात प्रत्येकी दोन बळी पडले.
महत्त्वाच्या बातम्या-
असा सामना पुन्हा होणे नाही! ९२ धावांवर डाव घोषित करुनही एक डाव अन् २७ धावांनी जिंकली मॅच
“एकट्या कोहलीवर बोट दाखवू नका, तेंडूलकर-पाँटिंगलाही आल्या होत्या अशा अडचणी”
पंजाब किंग्जला मजबूती, १४ कोटींच्या खेळाडूच्या जागी इंग्लंडच्या ‘या’ श्रेयस्कर गोलंदाजांची निवड